कोकणदिवा झाल्यावर समोर रायगड दिसला, तोरणा ते रायगड जाण्याची अतिव इच्छा होत होती, पण बरोबर कोणी नव्हते आणि फेब्रुवारी म्हंटल्यावर उन्हाने तस सगळच अवघड होणार होते, पण बरेच ठिकाणी वाचण्यात आले होते, रायलिंग पठार तिथुन दिसणारा लिंगाणा, आणि तिथुनच असणारी बोराट्याची नाळ, तर ठरले तर या शनिवारी रायलिंग पठार गाठायचेच. अनेक ठिकाणी वाचण्यात आले होते, की हारपुड गावापर्यंत रस्ता आहे, तिथुन मोहरी गावात पायी जावे लागते, मग म्हंटले की बघु गुगल मॅपवर काय दिसते आहे ते. गुगल मॅपवर तर थेट मोहरी गावापर्यंत रस्ता आहे असे दिसत होते infact मोहरी गावात तर बस स्टॉप आहे असे दिसत होते, म्हंटले च्याआयला काही ब्लॉगवाले बरेच पुर्वी जाऊन आलेले दिसता आहेत, आता तर बस जाते, म्ह्णजे कार तर जाईलच जाईल.
आम्ही निघालो around 7, तोरण्याच्या पायथ्यापाशी ९ च्या आसपास पोहोचलो, तिथे पोहोचुन नाश्तावगैरे घेतला आणि मढेघाटाकडे जाणारा रस्ता घेतला, तो रस्ता तसा सापडणे एकदम सोपे आहे, वेल्हे गावात कोणालाही विचारले, तर मढेघाटाचा रस्ता सहज सापडु शकतो. आम्ही नाश्ता करणार्या ठिकाणी विचारले की मोहरी गावाकडे जायचा रस्ता कसा आहे, तर तो सुद्धा तेच म्हणाला, तिकडे रस्ता नाहीये, हारपुड गावातुन पायी जावे लागते, आणि तुम्ही चांगले ट्रेकर असाल तरच जा नाही तर कठिण आहे. आम्ही म्हंटले की च्याआयला बस जाते आणि या लोकांना पत्ताच नाही!
आम्ही मढेघाटच्या रस्त्याला लागलो, मढेघाटात दरवर्षी आल्याने तो रस्ता परिचयाचा होता. मढेघाट म्हणजे ती जागा जिथुन तानाजी मालुसरे यांचे मृतशरीर (मढ) सिंहगडावरच्या लढ्यानंतर या घाटातुन कोकणातल्या त्यांच्या गावात नेले होते, म्हणुन मढेघाट. जर तुम्ही पावसाळ्यात मढेघाटात गेले नसाल, तर तुम्ही एका फार भारी गोष्टीस मिस केले आहे. असो, आम्ही निघालो, मढेघाटाच्या अलीकडे आल्यावर आम्ही एके ठिकाणी विचारले, मोहरी गावाचा रस्ता कुठे आहे, तेव्हा लोक म्हणाले, रस्ता आहे, तसा कच्चा आहे, पण गाडी जाईल तिकडे आम्ही विचारले, बस जाते का? तर ते म्हणाले, नाही अजुन रस्ता एवढा चांगला नाहीये की बस जाईल. Shit! गुगलने solid गंडवले.. जिथे बस जातच नाही तिथे बस स्टॉप दाखवला!
एवढ्या दुर येऊन ते ठिकाण न बघणे काही रुचले नसते, म्हणुन हिंमत करुन गाडी टाकली समोरुन एक सुमो येताना दिसली, म्हंटले, चला काही तरी गाडी तर येते आहे, पण लगेचच एका ठिकाणी रोडरोलर वगैरे आणुन खडी टाकणे वगैरे काम चालु होते, आणि भुसभुशीत मातीचा सगळा रस्ता होता, तरी हिंमत केली आणि गाडी घातली, सुदैवाने गाडीचे (माझ्या लोगानचे) ground clearance चांगले असल्याने गाडी निघुन गेली, मध्ये अजुन एका ठिकाणी रस्त्याचे काम सुरु होते, तेव्हा बाजुने गाडी काढली आणि अशी बरीच धाडसे करत कशी बशी गाडी मोहरी गावात आणली.
मोहरी गावातुन रायलिंग पठाराचा रस्ता तसा सरळ सरळच आहे, तिथे विचारले तर आम्हाला लोक म्हणाले, की जा रस्त्यात खाणाखुणा केल्या आहेत, आम्ही गेलो तसेच पुढे, पण अर्धापाऊण तास फिरफिर केल्यावर सुद्धा रस्ता काही सापडला नाही, आता काही होत नाही असे समजुन आम्ही परत फिरलो, पण आमचे नशीब जोरात होते त्यामुळे परत फिरत असताना एक गावातली धनगर बाई तिच्या मुली बरोबर दिसली, तीने रस्ता दाखवणे कबुल केले थोड्या रुपयात, म्हंटले ठिक आहे, तिथुन सुमारे अर्ध्या पाऊण तासात आम्ही रायलिंग पठारावर पोहोचलो, तिथुन लिंगाण्याचा अशक्य भारी view मिळत होता, आणि हो मागे रायगडसुद्धा, त्या बाईने आम्हाला रायगडकडे जाणारी बोराट्याची नाळसुद्धा दाखवली. तो view बघुन आम्ही पार वेडेच झालो होतो, आणि हो, काही अती धाडसी तरुण तरुणी समोर लिंगाणा सर करताना दिसत होते, जे आम्हाला कधी करणे शक्यच होणार नव्हते (खोटे का बोला).
जवळपास तासभर तिथे थांबुन आम्ही परत फिरलो, त्या बाईने आम्हाला परतीचा रस्तासुद्धा दाखवला, परत जाताना आम्ही ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खोदुन ठेवला होता त्यामुळे आम्ही एका दुसर्या रस्त्याने परत आलो, तो रस्ता खरतर रस्ताच नव्हता, एक गाडी जाईल एवढी जागा होती आणि डाव्या बाजुस दरी आणि उजव्या बाजुस पहाड, समोरुन कोणती गाडी आली असती तर काही खर नव्हते सुदैवाने तस काहीही न होता आम्ही सुरळीत मेन रोडला लागलो husshhh..
रायलिंग पठारावर जायला मजा तर आलीच पण काही गोष्टीपण समजल्या, पहिली म्हणजे, कुठेही कार घेऊन जायचे नाही, आणि गुगल मॅपसुद्धा गंडवु शकतात. असो, माझ्या मते मोहरी गावाचा रस्ता पुढच्या ४-५ महिन्यात बर्यापैकी तयार झाला असेल so जाऊन बघायला काही हरकत नसावी...

| Search on google map with this parameter, but beware the road is under construction, confirm with locals.. |
![]() |
| Look out for this sign on your left while on way to Madhe Ghat! |
| Boratyachi Naal route.. going from near Rayling pathar.. |