Tuesday, December 1, 2009

राहुल द्रविड The Great Indian Wall


सध्या सगळे सचिनचे ३०,००० रन्स आणि त्याचे Records, तो किती महान आहे (अर्थात त्यात काहीच वाद नाही), किंवा त्याच्यामुळे India किती Matches जिंकली वगैरे वगैरे या चर्चेत रंगले आहेत, पण एक गोष्ट आपण बरेचदा (सोईस्कररितीने) विसरुन जातो की सचिन एवढेच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडेसे अधिक (कसोटी सामन्यांमध्ये) Contribution करणारा एक महान खेळाडु Indian Team मध्ये आहे, आणि तो म्हणजे ’राहुल शरद द्रविड’.

राहुल द्रविड एक महान खेळाडु आहे यात शंका नाही पण त्याचे पुर्ण Career तो सचिन, सौरव, विरु या खेळाडुंमुळे थोडासा झाकोळला गेला (अर्थात बरेच Die Hard Fans हे मान्य करणार नाहीत), कदाचित तो जर Australia किंवा England च्या Team मध्ये असता तर अजुन Famous झाला असता (भारताचे नशिब त्यामुळे फ़ुटले असते यात वाद नाही). आपण सगळे राहुलला गृहित धरतो, तो आहे ना तो खेळेलच. भारत ५०/३, अच्छा द्रविड आहे ना अजुन मग ठिक आहे, गेल्या १०-१२ वर्षामध्ये भारताने जे काही कसोटीमध्ये यश मिळवले त्यात राहुलचा सिंहापेक्षा हत्तीएवढा वाटा आहे. त्याला उगाच नाही Indian Wall म्हणत.

Career च्या सुरुवातीला Jammy म्हणुन famous झालेला राहुल नंतर मात्र Wall या नावानेच ओळखला जातो. राहुल आणि सौरव हे दोघेही एकाच Batch चे I mean एकाच Match मध्ये सुरुवात केलेले खेळाडु, पहिल्याच वेळेस ९५ धावा करुन त्याने Strong Statement केले होते आणि कसोटीमध्ये आपले स्थान पक्के केले, सुरुवातीला त्याची तुलना Technically Perfect संजय मांजरेकर बरोबर झाली आणि One day मध्ये तर तो सुरुवातीला मांजरेकर एवढेच भिकार खेळायचा त्यामुळे त्याला ODI मधुन काढुन देखिल टाकले होते. पण १९९८ चा New Zealand Tour हा त्याच्या आयुष्यातला Lanndmark ठरला त्याच्या Test बरोबरच ODI मधल्या अप्रतिम खेळामुळे त्याने आपले संघातील स्थान पक्के केले आणि नंतर मागे वळुन पाहिले नाही, १९९९ च्या World Cup मध्ये पण त्याने कमाल केली, कसोटीमध्ये तर त्याने शतकांचा धडाकाच लावला होता आणि त्याच्या सातत्यामुळे तो लवकरच Mr. Consistant या नावाने ओळखला जाऊ लागला.

ज्या खेळपट्टीवर बाकीचे भारतीय खेळाडु नांगी टाकण्यात धन्यता मानत, अश्या ठिकाणी या पठ्ठ्याने शतके झळकावली, कसोटी वाचवण्यामध्ये तर राहुलला Phd मिळायला हवी, त्याने अनेक कसोटी सामने एकहाती वाचवले आहेत (आणि पुढे सुद्धा वाचवेल), (इथेच सगळे घोडे मार खाते, त्याने कसोटी वाचवल्या, लोकांच्या लक्षात राहतो फ़क्त विजय) त्याने अनेक कसोटी जिंकवल्या देखिल, (आठवा Adalaid test 2003-04 ची).

खरतर द्रविड अजुन बरेच Records करु शकला असता पण तो एक Team Man होता, २००३ चा पुर्ण World Cup त्याने Wicket keeping केली, जेव्हा कोणीच तयार नसायचे तेव्हा त्याला Opening ला पण पाठवले (In short त्याला ढोपरुन घेतले) आणि एवढे असुन सुद्धा त्याने प्रत्येक वेळेस Perform केले. राहुल खरतर एक Great Captain पण झाला असता (सुरुवात तर चांगली झाली होती), पण ग्रेग चॆपेल नावाचा राहु त्याच्या कुंडली मध्ये होता ज्याने भारतीय क्रिकेटचे वाटोळे केले आणि राहुलचे पण. लवकरच शहाणपण सुचल्यामुळे त्याने Resign केले आणि ODI मधले स्थान पण गमावले. मला अजुन कळले नाही की विराट कोहली, रैना आणि जाडेजा ही मंडळी द्रविडची जागा कशी काय भरुन काढु शकतात?? त्याने Comeback केला पण नंतर पुन्हा त्याला काढुन टाकले.

कसोटी मध्ये मात्र अजुन राहुलला Option नाही आणि सध्याची team बघितली तर कोणी त्याच्या जवळपासही भटकु शकेल असेही नाही. राहुल ODI मध्ये एक चांगला प्लेयर आहे पण कसोटी मध्ये तो महान आहे, सचिनपेक्षा सुद्धा.

मी स्वत: सचिनचा जबरदस्त Fan आहे पण राहुल द्रविड महान आहे ह्यात शंका नाही. सध्या ३६ वर्षांचा असलेला राहुल अजुन २ वर्षे आरामात खेळुन काढु शकेल आणि अजुन अनेकवेळा भारताला वाचवेल, मला तर असे वाटते भारताला सचिनपेक्षा पण जास्त राहुल द्रविड Retire झाल्यावर काय होईल या गोष्टीची चिंता करावी लागेल कारण अजुनसुद्धा Wall ला पर्याय नाही.

Post a Comment