Friday, March 26, 2010

संयुक्त महाराष्ट्र चळवळ....१



गेले काही दिवसात बरचं वाचन केले या विषयावर... हा विषय डोक्यात येणे पण योगायोगच होता, actually मुंबईत असल्याने audit साठी जवळपास रोजच कफ़ परेड, नरिमन पॉईंट आणि फ़ोर्ट area मध्ये जावे लागायचे आणि फ़्लोरा फ़ाऊंटन वरुन बस जायची... आणि फ़्लोरा फ़ाऊंटनच्या समोरच एक शेतकरी आणि अजुन एक माणुस आणि त्यांच्या हातात मशाल असा एक पुतळा होता, समोर महाराष्ट्राचा नकाशा आणि एक पेटती ज्योत (sponsered by HP gas) आणि त्याला नाव हुतात्मा चौक आता obviously हे सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी प्राणार्पण केलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे हे एक मराठी माणुस म्हणुन मला ठाऊक आहे, हुतात्मा चौकात सर्व १०५ हुतात्म्यांची नावे सुद्धा कोरण्यात आलेली आहेत.


Actually एक प्रसिद्ध वाक्य आहे, History is who we are and why we are the way we are म्हणजे आज आपण जे आहोत जसे आहोत याचे उत्तर हे ईतिहासात मिळते आणि त्यामुळे स्वत:चा ईतिहास ठाऊक असणे हे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.

पण याच्या व्यतिरिक्त मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल काहीच माहिती नाहीये, मला तर याबाबतीतचा एखादा धडासुद्धा पाठ्यपुस्तकात वाचलेले स्मरत नाही infact या बाबतीत काहीच माहिती असण्याचा दुरुन दुरुन संबंध आलेला नाही, हे तर आत्ता आत्ता राज ठाकरेच्या आणि बाळ ठाकर्‍यांच्या भाषणात उल्लेख येतो की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी १०५ लोकांनी प्राणार्पण केले आणि त्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली, १ मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो आणि तो एक सुट्टीचा दिवस असतो या व्यतिरिक्त या दिवसाचे माझ्या दृष्टीने काहीच महत्त्व नव्हते, कारण काही माहितीच नव्हती.

पण असच कुतुहलाने एक दिवस मी google search केले, wikipedia वर गेलो जरा संदर्भ चाळले, काही news articles वाचले आणि माझे कुतुहल आणखीच वाढत गेले, अनेक ठिकाणी आचार्य़ अत्र्यांच्या ’झालाच पाहिजे’ या पुस्तकाचा reference दिलेला वाचला आणि सरळ ठाण्यातल्या मॅजेस्टिक बुक डेपोत जाऊन ते पुस्तक विकत घेतले आणि अवघ्या ३ दिवसात त्याचा फ़डशा पाडला. आणि आता मला या विषयीची बरिच माहिती झालेली आहे आणि याची जाणिव सुद्धा झाली आहे की जर महाराष्ट्रात राहुनसुद्धा आपल्याला या गोष्टी कळल्या किंवा कळु दिल्या नाहित म्हणजे काही तरी problem आहे, कोणत्या गोष्टीच्या आधारावर आपण म्हणतो की मुंबई महाराष्ट्राची आहे किंवा बेळगाव कारवार निपाणी महाराष्ट्रात आला पाहिजे ?
Post a Comment