रेल्वेशी संबंध तसा बराच जुना आहे, भुसावळला सगळे बालपण गेल्याने रेल्वेशी घनिष्ट संबंध आहे, रेल्वे ईंजिन पासुन गार्डच्या डब्ब्यातुन सुद्धा प्रवास करुन झाला आहे, एवढा घनिष्ट संबंध पुण्यात आल्यापासुन एकदमच संपला, रेल्वेने जायची वेळच बरेच वर्षात आली नाही पण नंतर आर्टिकलशिप सुरु झाल्यावर पुन्हा oustation audits च्या निमित्ताने रेल्वेशी संबंध यायला लागला. Audits साठी बंगलोर, अहमदाबाद, चंदिगड, सोलापुर अशा अनेक ठिकाणी जावे लागले आणि ते रेल्वेनेच पाठवायचे. चंदिगडला जाण्यासाठी मुंबईहुन अगस्त क्रांती राजधानीचे तिकिट book व्हायचे त्यामुळे मजा होती.
मध्यमवर्गिय माणुस स्वत:च्या पैशाने राजधानी किंवा AC चे तिकिट शक्यतो काढत नाही (आता गरिबरथ आणि जनशताब्दींमुळे परिस्थिती बदलु लागली आहे हे मात्र खरे) आणि त्या गाडीतुन प्रवास करताना Families पेक्षा Office च्या कामासाठी जाणारे लोक जास्त सापडतात असो..., आता तर वेळ वाचतो या सबबी खाली Office च्या कामासाठी विमानानेच पाठवतात पण मला विमान प्रवास बोर होतो, च्या आयला सुरु झाल्याझाल्याच संपुन जातो आणि Low cost airlines मध्ये अजुनच वाईट परिस्थिती असते ते तर पाण्याच्या बाटल्यापण ४०-५० रुपयांना विकतात...पण आता बर्याच वर्षांनी मला पुन्हा रेल्वेने Audit साठी जायची वेळ आली, मुंबईहुन वापीला शताब्दीने जायचे टिकीट बुक झाले मुंबई अहमदाबाद शताब्दी सकाळी ६:२५ ला मुंबई सेंट्रलहुन गाडी सुटणार होती ही अजुन टेंशनची गोष्ट सकाळी ठाण्याहुन मुंबई सेंट्रलला जायचे म्हणजे बोंबच ४-४३० ला उठावे लागणार आधी विचार केला ठाणे-बोरीवली जाऊन बोरीवलीहुन गाडी पकडावी पण म्हंटले जाऊद्या मुंबई सेंट्रललाच जाऊ आणि नेहमीप्रमाणे गडबड गोंधळ लोकल चुकणे (५:१० ठाणे फ़ास्ट चुकली) प्रकार होत मी ६:२० ला मुंबई सेंट्रल गाठले, शताब्दी आणि राजधानीचे एक वैशिष्ट्य असते, दुनिया इकडची तिकडे झाली तरी या गाड्या वेळेवरच सुटणार आणि ६:२५ ला गाडी स्टेशन वरुन निघाली.
पण गाडीत पाऊल ठेवल्या ठेवल्याच एक वेगळाच राजेशाही Feel येतो गेल्या गेल्या लगेच ३-४ प्रकारचे वर्तमान पत्र, मिनरल वॉटर, मग थोड्यावेळाने चहा, कॉफ़ी आणि २ इक्लेअर्स (हे का देतात काही कळले नाही) मग पुन्हा नाश्ता & so on & so forth....मुंबई ते वापी हा जेमतेम २ तासाचा प्रवास होता पण मजा आली. आधी केलेल्या मुंबई-दिल्ली राजधानी च्या प्रवासाची आठवण झाली, राजधानी Best आहे सुपर फ़ास्ट आणि प्रचंड comfortable, एक जेवणाची quality सोडली तर बाकी नाव ठेवायला कुठेच जागा नाही. राजधानी आणि शताब्दी या गाड्या रेल्वेच्या दृष्टीने सुद्धा एकदम मानाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे
राजधानी/शताब्दी कधी लेट होत नाही,
त्या सगळ्यात फ़ास्ट जातात त्यांना सिग्नल लागत नाही,
त्या कधी सायडिंगला टाकत नाही,
त्यांच्या डब्यातले पाणी कधी संपत नाही,
त्यांचे सगळे डबे स्वच्छ असतात.
एकदा बातमी वाचली होती, कोणत्या तरी राजधानीच्या डब्यातले पाणी संपले होते त्यामुळे डब्यातल्या लोकांना फ़ार त्रास झाला तेव्हा रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी गेले आणि डब्यातील प्रत्येक प्रवाशाला एक sorry-card आणि एक dairymilk दिली..(कदाचीत हे potential law suit टाळण्यासाठी देखिल केले असेल)
येताना सुद्धा संध्याकाळच्याच अहमदाबाद-मुंबई शताब्दीचे reservation झाले होते आणि त्यामुळे शताब्दी मधले जेवण सुद्धा मिळाले, राजधानीतल्या जेवणानंतर मी जरा रेल्वेतील जेवणाचा धसकाच घेतला होता पण तरी म्हंटले आता तरी चव सुधारली असेल असा विचार करुन मी जेवण घेतले आणि फ़ुस्स्स्स्स्स तीच (बेकार) चव, जेवणानंतर तेच Vanila icecream...पण बाकी सर्व गोष्टी विचारात घेता ही गोष्ट क्षम्य आहे आणि आत्ताच काही दिवसांपुर्वी मी news ऎकली की आता रेल्वे जेवणाची चव सुधारणार आहेत बघु काय होते आहे ते...
मी असे पण ऎकले आहे की राजधानी आणि शताब्दी मध्ये एक फ़र्स्ट क्लासचा पण डबा असतो आणि ज्यात VVIP treatment मिळते, अजुन काही योग आला नाही प्रवास करायचा. Anyways... बघुया अजुन किती राजधानी-शताब्दी प्रवासाचे योग येतात ते....










1 comments:
>> राजधानीतल्या जेवणानंतर मी जरा रेल्वेतील जेवणाचा धसकाच घेतला होता. hehe... Mi pan...!!!
Post a Comment