Sunday, April 4, 2010

मराठी PJs

मुलगा- बाबा आज मला शाळेत गुरुजींनी विनाकारण शिक्षा केली
बाबा- का काय झाले?
मुलगा- ते म्हणाले स्पेन कुठे आहे
बाबा- मग सांगायचे ना
मुलगा- आता मला काय माहित की ते शाळेतल्या कुठल्या गोष्टी कुठे ठेवतात


विनु- अरे माझे वडिल घरावर एक मजला काढणार आहेत
मनु- माझे वडिल तर घरावर कर्ज काढणार आहेत


फ़ोन वाजतो घरी कोणी नसते म्हणुन पिंटु फ़ोन उचलतो
पिंटु- हेलो कोण बोलतय? घरात आई बाबा नाहीयेत
माणुस- माझा निरोप सांगशील का? नाही तर अस कर कागद पेन आण
पिंटु- हो आणलामाणुस- हं लिही आता
पिंटु- मला अजुन लिहीता येत नाही काका!!!


बाबा- राजु पटकन जा आणि ब्लेड्चे पाकिट घेऊन ये
राजु खुप वेळाने पाकिट घेऊन येतो
बाबा- कारे एवढा वेळ कसा लागला
राजु- अहो, चार दुकाने फ़िरलो शेवटी पाचव्या दुकानदाराने सुट्टे नव्हते म्हणुन चॊकलेट दिले


गुरुजी- जर तुझ्या आईने तुला दहा रुपये आणि तुझ्या भावाला तीस रुपये दिले तर काय होईल
मुलगा- आमची मारामारी होईल


एक खटला चालु असतो
वकिल- गुन्हा घडला तेव्हा तुम्ही किती अंतरावर होता
साक्षीदार- चाळीस फ़ूट, दोन इंचांवर
वकिल- कमाल आहे एवढे अंतर कशासाठी मोजले
साक्षीदार- मला माहित होते की कोर्टात असले मुर्खासारखे प्रश्न विचारतात


एका माणसाने घाईघाईने रिक्षा केली त्याला TV वर चित्रहार कार्यक्रम बघायचा होता, रिक्षा जोरात चालवावी असा तो आग्रह करत होता, शेवटी रिक्षावाला म्हणाला, 'हे पहा ह्या पेक्षा जास्त जोरात मला रिक्षा चालवता येणार नाही, नाहीतर माझ्याच चित्राला हार घालावा लागेल


एक आफ्रिकन निग्रो एका गोंडस पोपटाला आपल्या खांद्यावर बसवून बारमधे घुसला.'' अरे वा ... ही एवढी मजेदार गोष्ट तू कुठून आणलीस?'' बार टेंडरने विचारले.'' आफ्रिकेवरुन'' पोपटाने उत्तर दिले.


दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.
मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.
साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''
तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे'''' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''

Sources:-emails, messages etc

1 comments:

yog said...

naturally funny..hm