Friday, August 13, 2010

६३




अजुन एक स्वातंत्र्य दिवस तो पण रविवारी! म्हणजे एक सुट्टी अजुन गेली, मागच्या वेळेस शनिवार होता यावेळेस रविवार, पुढच्या वर्षी मात्र सोमवारी आहे त्यामुळे मस्त ३ दिवस सुट्टी त्यातच आपला आनंद. बाकी दिवस मस्त असतो, अनेकदा पावसाची रिमझिम चालु असते, देशभक्तीपर गाणे लागलेले असतात सकाळी सकाळी, "जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा" हे तर पेटंट गाण आहे आणि दुसर म्हणजे ए मेरे वतन के लोगो, या गाण्यांशिवाय तर हा दिवस पुर्ण होऊच शकत नाही. अजुन एक असते ते म्हणजे देशभक्तीचे पिक्चर लागलेले असतात, बॉर्डर, सरफरोश, इन्किलाब, प्रहार, भगतसिंग वगैरे वगैरे, म्हणजे टाइम पासला काही कमी नसते. आणि हो दुकानांमध्ये सेल वगैरे लागलेले असतात त्यामुळे शॉपिंगपण होऊन जाते आणि कितीही महत्त्वाचे काम असले तरी ऑफिसला जायचे नसते infact जाताच येत नाही कायदाच आहे तसा!


बघता बघता ६२ वर्ष झाली,आता या ६२ वर्षात काय काय झाले ते सांगण्यासाठी तर प्रत्येक न्युज चॅनेलने विशेष कार्यक्रम बनवुन ठेवले असतीलच. देशांच्या बाबतीत म्हणायचे तर भारत तसा तरुणच म्हणावा लागेल जेमतेम ६२ च तर वर्षच झालीयेत स्वतंत्र होऊन, पण त्यातपण केवढ्या सार्‍या गोष्टी झाल्या, हरित क्रांती, चांद्रयान, अणु चाचण्या आणि अणु करार, Information Technology ची क्रांती, अवकाशातले अनेक सॅटेलाईट (आर्यभट्ट पहिला), क्रिकेटचे दोन वर्ल्ड कप जेतेपद (20-20 धरुन), Tata चा कोरस टेक ओवर, विक्रम पंडितांची Citi bank च्या अध्यक्षपदी निवड, सचिन तेंडुलकरचा जन्म(!!), साहित्य-कला क्षेत्रातली क्रांती... युद्धे सुद्धा झाली ६२ चे चीनशी, ६५,७१ आणि १९९९ चे पाकिस्तानशी, अंतर्गत कलह तर चालुच आहेत, अतिरेकी हल्ले झाले, जातीय दंगे झाले, भुकंप झाले, सुनामी झाली आणि देवेगौडा सारखा माणुस देशाचा पंतप्रधान सुद्धा झाला, २ पंतप्रधानांची हत्या झाली, देशात आणिबाणी लागली, १९९०-९१ मध्ये तर देश विकायला काढायची वेळ आली होती. बाप रे एवढ्या सगळ्या गोष्टी फ़क्त ६२ वर्षात..Hmm...
बस झाल ना पण आता कौतुक, मिळाल ना आपल्याला स्वातंत्र्य, आता काय, आता थोडीच कोणी येणारे आपल्याला करायला लावायला, वेळ कोणालाय इकडे, आणि काय ते स्वातंत्र्य, च्या आयला दिवसातले २४ तास साधे लाइट नसतात, अर्धे लोक तर उघडे नागडे फिरत असतात, अर्ध्या लोकांना लिहीता वाचता येत नाही, इथे लोकांना नोकर्‍या नाहीयेत, भ्रूण हत्या होतेय honour killings होता आहेत आणि म्हणे IT क्रांती! काही मोजकी शहरे सोडली तर प्रगती आहे कुठे?, रस्ते धड नाहीयेत, भ्रष्टाचार तर बोकाळला आहे आता कशात भ्रष्टाचार नाहीये हा संशोधनात्मक विषय आहे, भसाभस लोकसंख्या वाढली आहे, राहायला जागा नाहीये, आपण रडतो गरिब गरिब म्हणुन आणि आपल्याच गरिबीचे भांडवल करुन लोक ऑस्कर घेऊन जात आहेत, इथे कोणीपण येऊन कानात मारुन जाते, लोकांच्या खाली बॉंब फुटता आहेत आणि सरकार अमन की आशा करत बसलीये... आहे का हिंमत कोणाची? येतील का गांधी, टिळक, भगतसिंग पुन्हा? पण ते येऊन करतील काय?, लढतील कोणाशी?, इथे परक्यापेक्षा आपलेच धोकादायक आहेत, राज्यच एकमेकांशी धरणांवरुन, सीमांवरुन, नोकरी धंद्यांवरुन भांडता आहेत, दक्षिणेतल्या राज्यात तर राष्ट्रभाषाच वर्ज्य, काश्मिरमध्ये नेमके काय चालु आहे कधीच कळत नाही, आणि उत्तर पुर्वेकडे नेमकी किती राज्य आहेत आणि त्यांच्या राजधान्यांची नाव सांगा हा प्रश्न कौन बनेगा करोडपती मध्ये १२,५०,००० ला नक्कीच विचारण्याच्या लायकीचा आहे.
पण काय आहे की हा देश माझा आहे, त्यामुळे एक नागरिक म्हणुन माझा हक्क आहे हे सगळ बोलायचा कोणी दुसरा येऊन मला हे सांगेल हे काही मान्य नाही, रंग दे बसंती मध्ये माधवनच्या तोंडी एक डायलॉग आहे, "कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है", आहेत प्रॉब्लेम्स यार, काय करणार आता?, १५० वर्ष ओरबाडुन खाऊन चोथा करुन थुंकुन दिल्यावर आमच्या पायावर उभे राहिलो आहोत आम्ही, कोणी दया येऊन स्वातंत्र्य नाही दिले, लढुन झगडुन मिळवले आहे हे स्वातंत्र्य, आणि मला तर एक गोष्टच कळत नाही की लोक भारत आणि अमेरिकेला कंपेअर कसे करतात, अमेरिका स्वतंत्र झाली ती १७७६ साली म्हणजे भारताच्या तब्बल १५० वगैरे वर्ष आधी त्यामुळे कोणतीही तुलना शक्यच नाहीये.
इतक्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन ६२ वर्षातच एवढी प्रगती करणे आणि ती सुद्धा एका लोकशाहीने म्हणजे खरच वाखाणण्याजोगे आहे, त्यामुळे कोणी काहीही म्हणो पण मला विश्वास आहे माझ्या देशावर की तो एक महासत्ता होणारच, काही दिवसांनी जगाची सगळी चक्रे भारतातुनच फिरतील आपण म्हणु ती पुर्व दिशा, शांघायचे लोक म्हणतील की शांघायची मुंबई करा, कॅलिफोर्नियाचे लोक म्हणतील कॅलिफोर्नियाचा कोकण करा, आणि ऑक्सफर्डला पश्चिमेकडचे पुणे म्हणतील. आपला रुपया (`) जागतीक चलन म्हणुन वापरला जाईल आणि IMF, WORLD BANK, UN दिल्लीत हेड ऑफिस थाटतील (ICC चे तर बारामतीमध्ये शिफ्ट होण्याच्या मार्गावर आहेच).
स्वप्नतर फार मोठी मोठी आहेत, वेळ लागेल थोडा, अडचणीपण
भरपुर येतील पण होतील ती पुर्ण हा विश्वास आहे.
जय हिंद

3 comments:

Maithili said...

Nice one...I liked it...!!!

Anonymous said...

भारताने किवा चीनने किवा दोघानी मिळून आपल्या कडचे डॉलर्स वा युरो विकायला काढले तर या श्रीमंतांची पिसे वाऱ्यावर उधळतील.

Sagar Kokne said...

एका डोळ्यात हसू आणि एकात आसू...
अशी सध्या भारताची स्थिती आहे...
एकीकडे अतीश्रीमंती तर दुसरीकडे अतीगरिबी...तरीही लढतो आहोच...

http://majhyamanatalekaahee.blogspot.com/2010/08/blog-post_15.html