मला तर काही कळेनासे झाले आहे, आता जाती भेदाभेद वगैरे तर पुर्वीपासुनच चालु आहेत आणि आतासुद्धा बर्याच प्रमाणात आहेत अस्तित्वात. काही लोकांना वाटत की महाराज फक्त त्यांनाच आदरस्थानी आहेत आणि बाकीच्यांना नाही, आजच बातमी वाचली की लाल महालातुन दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवणार आहेत का मला नाही माहित.. आणि स्टार माझाच्या फेसबुक पेजवर हे टाकले होते आणि त्या खाली एकजण कमेंट देत होता की तुम्ही लोक असेच आहात, जेम्स लेनला मदत करतात महाराजांचा अपमान होतो वगैरे वगैरे.. अरे बॉस इथे एक मराठी माणुस दाखवुन दे की ज्याला महाराज आदरस्थानी नाहीयेत.
हे आजच झाल पण एकदा मी आपल्या साहित्य संमेलनात (आत्ता पुण्यातल) गेलो होतो तिथे भरपुर पुस्तकांचे स्टॉल लागले होते पर्वणीच होती पुस्तक प्रेमींना, असच फिरत होतो तेव्हा एक स्टॉल दिसला तिथे शिवाजी महाराजांचे चित्र असणारी बरिच पुस्तके होती, सहज म्हणुन चाळली असता हादरलोच, इतक्या अर्वाच्य भाषेत ब्राम्हणांना शिवीगाळ करणारी पुस्तके मी आत्ता पर्यंत बघितली नव्हती, इतका द्वेष असु शकतो का कोणाच्या मनात? तिथे दादोजी कोंडदेवांपासुन समर्थ रामदास आणि संत तुकारामांवर टीका करणारी पुस्तके होती आणि ती टीका इतक्या वाईट शब्दात केली होती की लिहिणार्याने ती लिहिली कशी हा प्रश्न मला पडला. मी माझ्या आजोबांना विचारले की हे इतक वाईट कोणी कस काय लिहु शकत, त्यांनी एका शब्दात उत्तर दिले "Jealousy".
बर्याच ठिकाणी असे अनुभव येतात, एका किल्ल्याच्या पायथ्याला कोणा एका संस्थेमार्फत एक बोर्ड लावला आहे, सर्व गडाची माहिती लिहुन झाल्यावर ते म्हणतात की पेशव्यांमुळे शिवरायांच्या किल्ल्यांची दुरावस्था झाली. आता थोड मागे गेल तर संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर आलेल्या औरंगजेबाच्या आक्रमणात बरेच किल्ले उध्वस्त झाले होते हा मुद्दा सोईस्कररितीने गाळुन टाकण्यात येतो.
असो चालायचेच आता शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर कुणाचे नाव घ्यायचे झाले तर तो येतो पहिला बाजीराव पेशवा पण प्रामाणिकपणे सांगा की किती लोकांच्या लक्षात होते की १८ ऑगस्टला बाजीराव पेशव्याची जन्मतिथी होती? आणि मध्य प्रदेशात रावेत येथे असणारी यांची समाधी आता एका धरणाच्या बांधकामामुळे पाण्याखाली जाणार आहे, किती लोक पुढे येतिल ही समाधी वाचवण्यासाठी? ते सोडा आपल्या पुण्यातला कर्वेंचा पुतळा वाहतुकीला अडथळा येतो म्हणुन हलवला, याच जागी जर दुसर्या कोणाचा पुतळा असता तर इतक्या सहजतेने हलवता आला असता का?
Anyways आता पुतळे हलवुन आणि पाठ्यपुस्तकातला मजकुर वगळुन जर खरच महाराजांच्या स्मृतीचा आदर होणार असेल तर होऊद्या त्यात आनंदच आहे, नाही कळणार पुढच्या पिढीला की होते कोणी दादोजी कोंडदेव जे महाराजांना गुरुस्थानी होते, आता पुरंदर्यांच्या राजे शिवछत्रपतीमध्ये तर आहे उल्लेख आणि श्रीमान योगी मध्ये सुद्धा आहे इतके मोठे लेखक पुराव्याशिवाय छापतील का अस? पण ठिक आहे तुम्हाला नकोय ना मग काढुन टाकतो शेवटी आपली वोट बॅंक महत्त्वाची..










4 comments:
हे वाच व हीच माझी कॉमेंट समज
http://sagarkinaraa.blogspot.com/2010/08/blog-post.html#comments
सबकुछ वोटबॅंक,
एक पंजाबी आश्वासन देतो, आपले मराठी माना डोलावतात...
दादोजी कोडदेव नसते तर जीजाऊं ना महाराजांचे शिक्षण करणे किती कठिण गेले असते ह्याचा विचार करा म्हणाव, अविचार नको.
गौरव, खरं तर यांची भाषा आणि यांची वाटचाल हिटलरच्या दिशेने जाते आहे. इतका विद्वेष पसरवून काय मिळेल देव जाणे. यांना शिवाजी महाराज पण समजले नाहीत, संत समजले नाहीत..यांना समजतात फ़क्त राजकीय फायदे, आणि त्यासाठी हे काय वाट्टेल ते करू शकतात. इतिहासात कोणाचंही योगदान नाकारता येत नाही, मग तो ब्राह्मण असो वा अन्य कोणी. योग्य संशोधन करून आणि योग्य पुरावे देऊन जर का इतिहास लिहिला तर तो स्वीकारण्याची आपली तयारी पाहिजे. मग अशा वेळी कोणी दडपशाही केली तर ते निश्चित निषेधास पात्र आहे.
Post a Comment