Monday, September 13, 2010

पहिली विकेट पडली..

पहिली विकेट पडली..आमच्या एका मित्राने एका विवाह संस्थेत नाव नोंदणी केली आहे... त्याने ती गोष्ट आमच्यापासुन लपवुन ठेवली पण ती कळलीच, त्याच अस झाल की त्या विवाह संस्थेचे चालक माझ्या मित्राच्या ओळखीचे होते, अमुक अमुक कॉलेज आणि CA बघितल्यावर त्यांनी सहजच माझ्या मित्राला विचारले की तु या अमुक अमुक मुलाला ओळखतो का? आणि नाव कळल्यावर तर तो उडालाच, आणि सांगितल की हो ओळखतो चांगला मित्र आहे माझा वगैरे वगैरे, आणि लगेचच त्याने मला सांगितले की आपल्यातल्या एकाची लवकरच विकेट पडणार आहे.

आधी तर आम्ही खुप हसलो एकतर विश्वासच बसला नाही.. हा लग्न करणार.. बोंबला... काल पर्य़ंत आपल्याबरोबर पावटेगिरी करत फिरणारा हा आता लग्न करणार?? म्हणजे आमच्या ग्रुप मध्ये याचेच आधी लग्न होणार याची आम्हाला खात्री होती पण एवढ्या लवकर हा तर शॉक होता, आता परवाच तर याच्या २५ व्या वाढदिवसाची पार्टी आम्ही खाल्ली तेव्हा तर याने काहीच सांगितले नव्हते आणि आता डायरेक्ट बॉंबच टाकला त्याने ते पण न सांगता!

आता पहिली विकेट तर पडली, ही सुरुवात आहे आमचे सगळे (GF नसलेले) मित्र मागे रांगा लाऊन उभे आहेत आपली विकेट कधी पडणार याची वाट बघत, आता माझ्यासारखी पंचवार्षिक योजना असणारे माझे मित्र कमीच आहेत त्यामुळे मला तर काही दिवसांनी अशी भिती वाटते आहे की कोणी मित्रच उरणार नाही, कारण एकदा का लग्न ठरले की मग मित्र मागच्या रांगेत जातात (ते साहजिकच आहे) आणि लग्नाचे २-३ वर्ष ते तिथेच राहतात पण मग पुन्हा त्यांचे आगमन होते हे मला एका अनुभवी मित्राने सांगितले होते.

ह्या लग्न करण्यामध्ये एक पीअर प्रेशर नावाचा पण प्रकार असतो हे मला नव्यानेच कळले, माझ्या मित्राचा भाऊ लग्नाला काही तयार होत नव्हता त्याच्या घरचे चिंतेत होते पण त्याच्या एक दोन मित्रांची लग्ने झाली आणि हा लगेचच लग्नाला तयार झाला! हाप्रकार इथे सुद्धा चालतो तर, च्या आयला टेन्शनचे काम आहे. Actually हा असा काही विषय निघाला की आमच्या मित्रांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते आणि काही मित्र हल्ली हाच विषय काढतात मला तर वाटत की ही लोक कार्ल्सबर्ग किंवा किंगफिशरची हस्तक असावीत कारण या विषयाचा शेवट त्यानेच होतो.

पण सध्यातरी तशी काही भिती नाही वाटत कारण पंचवार्षिक नसली तरी त्रैवार्षिक योजना असणारे बरेच मित्र आहेत त्यामुळे अजुन किमान ३ वर्षतरी पावटेगिरी करण्यास हरकत नाही, पण न जाणो जर कोणी फिक्सिंग करुन लवकर विकेट फेकली तर मात्र बोंब होईल कारण इथे सगळी मेंढरे आहेत एकाच्या मागे एक जाणारी आणि पीअर प्रेशर सोडुन एक पॅरेंट प्रेशरसुद्धा असते त्यालापण म्हणे खुप लोक बळी पडतात, असो सध्यातरी कुठलेच प्रेशर न घेता खेळायचे आहे आणि पुढिल ५ वर्ष तरी नाबाद राहायच आहे.
Post a Comment