आज बर्याच दिवसांनी पिझ्झा हट ला जाऊन वाढलेले वजन आणि घेर विचार न करता मस्त पिझ्झा हाणला, मजा आली, आणि मग बिल आले.. मग नेहमी प्रमाणे मित्रांनी बिलाचे Audit सुरु केले (कॉमर्स शेवटी) आणि मग बघितले तर बिलात १० जास्तीचे लावले होते की UN World Food Programme ला आमच्याकडुन Contribution. वेल प्रत्येक टेबलवर त्यांनी त्याचे माहिती पत्रक सुद्धा ठेवले होते (खालचा फोटो बघा). आता आमचे लगेच पुढच्या पिक्चरच्या शो चे बुकिंग झाले होते म्हणुन उगाच नसत्या चौकश्या न करता आम्ही तिथुन निघालो, आता ४००-५०० रुपयांचा पिझ्झा खाल्ल्यावर १० रुपये काय जास्त होतात का?
पण इथे प्रश्न १० रुपयाचा नाहीये, प्रश्न आहे सक्तीच्या दानाचा, आता ठिक आहे की त्यांनी इथे म्हंटल आहे की तुम्हाला ते डोनेशन द्यायचे नसेल तर तुम्ही सांगा आम्ही ते Add करणार नाही, पण अस कोणी करणार नाही हे ही मात्र तितकेच खरे, आता पिझ्झा हट ला पोर गर्लफ्रेंडला घेऊन येतात, तिथे त्यांनी असा चिंधीपणा दाखवला तर पुढे बोलायलाच नको, म्हणजे उगाच लोकांच्या भावनांचा फायदा घेऊन हे डोनेशन घेतले जात आहे. आता उद्या वडेवाल्या जोशींनी वडापावचा १ रुपया वाढवुन सांगितले की १ रुपया चॅरिटीला देणार, तर देणार का लोक तो रुपया? पण ठिक आहे, पिझ्झा हट आणि वडेवाले जोशींचा कस्टमर बेस अगदी भिन्न आहे त्यामुळे कंपॅरिजन थोडी far fetched वाटते.
पण मुद्दा असा की दान करणे (कोणतेही) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न नाहीये का? मग सक्तीचे दान घेणे हे कितपत योग्य आहे? पण एका अर्थी ही ज्याची कोणाची idea आहे ती भन्नाटच आहे. ९९.९९% वेळेस कोणीही नाही म्हणणार नाही. ह्याच्यावरुन आठवले मागच्याच आठवड्यात पेपर मध्ये वाचले होते की बिल गेट्स ने आयोजीत केलेल्या कार्यक्रमास चिनी उद्योजकांनी नकार दिला कारण त्यांना भिती होती की त्यांना डोनेशन देणे भाग पाडले जाईल.
आता प्रश्न हा खरच १० रुपयाचा नाहीये कारण आमच्या काही सुपीक बुद्धीच्या मित्रांनी गणित मांडल्यावर अस लक्षात आले की, आम्ही जिथे होतो (वाशीला Inorbit मध्ये) तिथे जवळपास ३० टेबल होते, आता एका दिवसात तिथे ३५० बिल तर होत असतीलच (on an average, विक डेज ची कमी वीकेंडला भरुन निघत असेल + पार्सल) तर एका दिवसात ३५०० रुपये, वर्षाचे जवळपास १२.६० लाख एका outlet मधुन, अशी पिझ्झा हटची १५०-२०० outlet भारतात आहेत तर ढोबळ मानाने २० करोड रुपये वर्षाचे जमा होतील. आणि हे सर्व डोनेशन UN च्या वर्ल्ड फुड प्रोग्रॅमला दिले जाईल ज्याचा उपयोग भारतातल्या उपाशी लोकांसाठी केला जाईल. (अरे हो आणि KFC मध्ये सुद्धा अशीच योजना सुरु केली आहे)
आता वाटु शकत की वीस करोड ही फार रक्कम नाहीये , आणि त्या साठी एवढी पोस्ट लिहीण्याची काही गरज नाहीये उगाच दहा रुपयांसाठी एवढा पसारा का? आणि पैसे चांगल्याच ठिकाणी जाणार आहेत ना? आपण ४००-५०० रुपयांचा पिझ्झा हाणु शकतो म्हंटल्यावर १० रुपये काही जास्त नाहीये आणि तसे पण किती लोक स्वत: हुन मदत करतात, मग केली थोडी मदत तर काय बिघडणार आहे, लाभल तर थोड पुण्यच मिळेल ना,
ठिक आहे की पिझ्झा हट एक विश्वसनीय नाव आहे, पण ती काही सरकारी संस्था नाहीये, ते ही रक्कम पोहोचवतील का त्यांच्याकडे? आणि कधी? प्रत्येक दिवशी ? का प्रत्येक महिन्या अखेरीस? का प्रत्येक वर्षा अखेरीस आणि हो मेन मुद्दा हा आहे की हा लोकांचा पैसा आहे, पिझ्झा हटचा नाही, मग पिझ्झा हट किती देणार त्यांना का उघड दान फक्त लोकांकडुन? ह्या सर्व गोष्टी कळण्याचा काही मार्ग नाही. वर्षाअखेरीस हा पैसा दिला तर पिझ्झा हट हा पैसा फुकट वापरणार यात वाद नाही,
मला वाटत की दान (कोणतेही) करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि लोक चॅरिटी करतात सुद्धा ते देखील न सांगता, माझा एक मित्र आहे पार भुरटा म्हणजे त्याने बरेचदा कॉलेजच्या पार्किंगचे २ रुपये सुद्धा माझ्याकडुन वसुल केले आहेत, पण त्याने त्याचा पहिला (अर्धा) पगार Prime Minister relief फंडला दिला होता, हे त्याने आम्हाला देखील सांगितले नव्हते, एकदा त्याच्या फ्लॅटवर असताना अचानकच ती पावती आम्हाला दिसली. Anyways, मी जरा जास्तच चौकसपणा दाखवत, पिझ्झा हट च्या वेबसाइट वर त्यांना हे प्रश्न विचारले आहेत, उत्तर मिळाले तर ते देखील पोस्ट करीनच.










9 comments:
छान लिहिलं आहेस एकदम. हे जबरदस्तीचं दान तर अस्थानीच.. मला वाटतं तू सरळ त्यांना सांगायला हवं होतंस की मला हे पैसे द्यायचे नाहीत.. काय वाटायची ती चिंधीगिरी वाटूदेत त्यांना.. कारण तू शेवटी मांडलेला हिशोबाचा अवाढव्य डोंगर पाहता ते तेवढी रक्कम खरंच दान देत असतील यावर विश्वास ठेवणं चांगलंच कठीण जातंय.
योग्य observation आहे . तांत्रिक भाषेत या युक्तीला opt -out technique म्हणतात . याचा वापर असल्या छोट्या छोट्या दानापासून ते थेट organ donation साठी सुद्धा केलं जातो. काही युरोपिअन देशांमध्ये प्रत्येक वयस्क माणसाच्या वैद्यकीय कागदांमध्ये एक clause घालून ठेवलेला असतो ज्यानुसार जर त्यांना त्यांचे डोळे, kidney इत्यादी मृत्यू पश्चात दान करायचे नसल्यास डॉक्टर ला विशेष कळवावे लागते. उगाचच नाही त्यांचे organ donation rates एवढे जास्त आहेत! या युक्तीमध्ये माणसाच्या psychological inertia चा पुरेपूर वापर होतो . Humans are always more likely to keep the status-quo than take the effort to change it. या पिझ्झा हट वाल्यान कडून आणखी खूप पारदर्शकता हवी .
भन्नाटच आहेत रे हे लोक...!!! अरे...तुम्ही बिल चे Audit तरी केलात...बर्याचदा तर तेही करत नाही कोणी...म्हणजे ही तर चक्क फसवणुक झाली न...coz...कोणी स्वेछेने कोणाला काही देऊ केले तर च ते दान समजले जाते....!!! निदान तुम्ही बिल check केले म्हणून तुम्हाला समजले तरी की तुम्ही कोणाला, आणि कशासाठी "दान" करता आहात ते...!!!
@ हेरंब:- मला सुद्धा तेच वाटत होते की सरळ जाऊन सांगावे त्यांना पण माहित नाही का मी अस केल नाही, पण पुढच्या वेळेस मात्र त्यांन आधी सांगणार की काहीच मिळणार नाहीये, अजुन सुद्धा त्यांच्या वेबसाइटवर टाकलेल्या query चा काही रिप्लाय आला नाही.
@ Abhishek:- Humans are always more likely to keep the status-quo than take the effort to change it, अगदी बरोबर, बरेचदा कॉर्पोरेट्स मध्ये येऊन ही लोक चॅरिटीबद्दल सांगतात आणि तिथेच डोनेशन फॉर्म भरुन घेतात आणि लगेच पगारातुन डिडक्शन सुरु, of course चॉइस असते पण जर तुमच्या बरोबरचे सगळेच देत असतील तर तुम्ही odd man out बनणे वेगळे दिसते, pure play with human emotions.
@ मैथिली:- बरेचदा लोक बिल चेक करत नाही म्हणुनच तर फावते, कारण तिथे येणारे बहुतांश लोकांना कळणार सुद्धा नाही की दहा रुपये add झाले आहेत बिलात.
I like this strategy. Its marketing strategy.
ही strategy चांगली का वाईट , हा मुद्दा जरी थोडा वेळा करीता बाजूला ठेवला तरी एक प्रश्न राहतोच - एवढा पैसा जातो कुठे ? इथे दिलेले उदाहरण घ्यायचे झाले तर UN World Food Program सारख्या प्रतिष्ठित संस्थेत सुद्धा मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे, त्यावर एक investigation सुद्धा चालू आहे - http://www.huffingtonpost.com/2010/09/30/jon-stewart-linda-polman_n_745394.html
Nice Observation & smart study.. Gaurya...!! like it.. Even I dont think whether such a bulk amount of donation really reach its destinations or not...!! And at the end as we are citizens of India... our thinking has such that we think ten times before if we r gonna pay even a singly penny for donations, whatever it may for... There r lots of examples where billions of donations haven't reached to its destiny.. eg.. Tsunami, earthquakes.. Where these donations were not binding.. still they didnt reach there.. Then the question is that.. Why to donate if u are confused whether ur money will reach there and you'll be blessed...??
.
.
.
.
.
.
.
I think just to keep your identity in your frenz/gfs that you are not a miser...(For not fighting for 10 rs.)..
What say???
Post a Comment