Sunday, September 19, 2010

Bye Bye Freddi....


फ्रेडी फ्लिंटॉफ म्हणजेच आपला ऍंड्र्यु फ्लिंटॉफने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केल्याची बातमी कालच ऎकली, तस तर त्याने टेस्टमधुन आधीच निवृत्ती जाहिर केली होती आणि आता तर सर्व प्रकारच्या Forms मधुन तो निवृत्त झाला. आता फ्लिंटॉफ हा काही अगदी महान वगैरे खेळाडु नव्हता पण तो Crowd Pulller होता, इंग्लंडची पब्लिक त्याला बघायला गर्दी करायची आणि तो सुद्धा त्यांना निराश न करता मस्त खेळायचा.

तसा तो बर्‍याच आधीपासुन खेळायचा पण २००५ च्या Ashes नंतर त्याला खरी ओळख लाभली, त्या आधी त्याने बरेचदा टीमच्या आत बाहेर सुद्धा केले होते पण या सिरिज नंतर त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलुन गेला, अस म्हणतात की १९८१ सालची Ashes ही बोथमची ऍशेस म्हणुन ओळखतात त्याच प्रमाणे २००५ ची Ashes ही फ्लिंटॉफची Ashes म्हणुन ऒळखली गेली तर वावगे ठरायला नको. २००५ च्या वेळेस इंग्लंडमध्ये क्रिकेटची वाईट परिस्थिती होती लोक क्रिकेटच बघत नव्हते, म्हणुनच ECB (England and Wales Cricket Board) ला 20-20 सारखे पर्य़ाय शोधावे लागले की Atleast लोक खेळ बघायला तरी येतील, (well 20-20 चा शोधसुद्धा इंग्लंडमध्येच लागला आहे). आणि अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया त्यांची फुल स्ट्रेंग्थ टीम घेऊन इंग्लंडला येत होती. As usual Aussies सिरिज सुरु होण्याच्या आधीच इंग्लंड ५-० ने हारणार वगैरे वल्गना करु लागली होती.

पण या वेळेस नेहमीची कचखाऊ इंग्लंड नव्हती, कदाचित डिवचले गेल्यामुळे का काय इंग्लंड जरा फॉर्मातच दिसत होते, पण ऑस्ट्रेलियाने त्यांची सगळी हवा काढत पहिली मॅच खिशात टाकली, आणि पुन्हा ५-० च्या बाता मारल्या, पण दुसर्‍या एजबस्टन टेस्टला फ्लिंटॉफ पेटला होता बॅट आणि बॉलने सुद्धा, त्याने ऑस्ट्रेलियाची वाताहत केली, त्या Ashes मध्ये फ्लिंटॉफ, हर्मिसन आणि सायमन जोन्सच्या त्रिकुटाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरु केले, खुप दिवसांनी अशी टेस्ट सिरिज बघायला मिळाली, दोन्ही टीम जिंकण्यासाठी खेळत होत्या आणि दोघांमधला फरक होता Freddie.. खांदा दुखावला असताना सुद्धा त्याने तडाखेबंद खेळी केली आणि जबरदस्त बॉलिंगकरुन ऑस्ट्रेलियाचे कंबरडेच मोडले. फ्रेडीच्या त्या परफॉर्मन्सने त्याला इंग्लंडचे कर्णधारपद सुद्धा मिळवुन दिले, पण २००६-०७ च्या ऑस्ट्रेलियातल्या Ashes मध्ये, ऑस्ट्रेलियाने बदला काढत ५-० ने इंग्लंडला धुतले आणि फ्लिंटॉफचे कप्तानपद सुद्धा गेले. २००९ ची Ashes फ्लिंटॉफची शेवटची होती, त्याने सिरिज पुर्वीच त्याची निवृत्ती जाहिर करुन टाकली होती, पण जाता जाता सुद्धा त्याने Lord's test मध्ये एक दणदणित परफॉर्मन्स देऊन ऑस्ट्रेलियाला पुन्हा दणका दिला.

आता फ्लिंटॉफ हा काही जंटलमन क्रिकेटर वगैरे नव्हता, भरपुर स्लेजिंग करायचा आणि मैदानाबाहेर पण काही फार कॅरेक्टर त्याने दाखवले नाही, २००७ च्या वेस्ट इंडिज मधल्या वर्ल्ड कप मध्ये त्याने दारु ढोसुन एक होडी समुद्रात नेली होती आणि तिथे ती होडी उलटली आणि ह्याला तिथल्या लोकांनी बाहेर काढला, भारतात सुद्धा २००२ ची मुंबईत झालेली वन डे जिंकल्यावर ह्याने शर्ट काढुन पुर्ण मैदानाला फेरी मारली होती, नंतर गांगुलीने त्याचा वचपा काढला तो भाग वेगळा, आणि हो युवराजने T-20 - वर्ल्डकप २००७ मध्ये जे ६ छक्के मारले होते, त्यावेळेस सुद्धा ब्रॉडच्या ओवरच्या आधी फ्लिंटॉफने त्याची कुरापत काढलीच होती, Well, ती त्याला फारच महाग पडली असेच म्हणावे लागेल.

२०१० ची Ashes नोव्हेंबर मध्ये होईल सुरु पण त्यात फ्लिंटॉफ नसेल. मला तर या प्लेयर्सच्या होणार्‍या इंज्युरीजना 20-20 च जबाबदार वाटते, IPL, T-20 वर्ल्ड कप, आणि आता चॅंपियन्स लीग, पार वैताग आलाय, फ्लिंटॉफ, ब्रेट ली, शेन बॉंड वगैरे मंडळींना तर या 20-20 मुळेच टेस्ट मॅचला राम राम सांगावा लागला अस मला वाटत.

तर असा हा फ्रेडी, खर तर काही प्लेयर असतात, खुप टॅलेंट असते पण ते कधी कधीच बाहेर येते, फ्रेडीचे पण तसेच होते थोडे, आत्ता कुठे तो थोडा मॅच्युअर वगैरे होऊन खेळायला लागला होता आणि लगेचच रिटायरमेंट...... Anyways, फ्लिंटॉफचे वर्णन करताना क्रिकेट समालोचक पीटर रोबक म्हणतो,"
"Several factors lie behind England's obsession with Flintoff. Partly it is a nation's need for heroes. Partly it is the manner in which he plays his cricket, with generosity and adventure. Partly it is the way he takes on the Australians"
(Image: Cricinfo)

1 comments:

Sagar Kokne said...

२००५ ची ऐशेस मस्तच झाली होती. इंग्लेंडने पार उतरवली कांगारूंची..:P