Sunday, October 17, 2010

दसरा


दसरा हा माझा एकदम आवडतीचा सण आहे, म्हणजे त्याचे धार्मिक वगैरे महत्व असेल पण मला तो सोने वाटणॆ, लुटणे आणि सीमोलंघन करणॆ हा प्रकार खुप आवडायचा म्हणजे अजुनही आवडतोच पण आता ती मजा नाही, कारण सोने वाटणे वगैरे प्रकार तर आता संपुष्टातच आला आहे, सीमोलंघन तर दर महिन्याला होतच असते. घरी काय जी लहान मुले येतील त्यांनाच सोने द्यायचे मग ती दादा दादा म्हणुन पायावगैरे पण पडतात, काही पोर काका पण म्हणतात मग त्यांना सांगावे लागते, की अबे दादा म्हण नाही तर चॉकलेट विसर!


लहानपणी सोने वाटणे हा एक खुपच भारी प्रकार असायचा, आधी टोळके भरवुन गल्ली मध्ये फिरायचे, आणि बघायचे कोणत्या घरामध्ये काय खाऊ मिळतोय, आणि मग सांगायचे, अबे त्या काकुंकडे श्रीखंडाच्या गोळ्या आहेत, आणि त्या काकु बर्फी देता आहेत, अबे तिकडे नको जाऊ ते काका फक्त साखर देता आहेत, आणि अजुन एक म्हणजे दुकानदारांना सोने द्यायचे, म्हणजे हमखास चॉकलेट मिळण्याची खात्री! खाणे-पिणे याबाबतीत लाज वगैरे प्रकार हा कधीच नव्हता आणि आजही नाहीये.


गल्लीत सोने वाटुन झाल्यावर नंबर यायचा तो सगळ्या शिक्षकांचा, मग सगळ्या शिक्षकांकडे गेल्यावर तिकडे सगळी शाळा लोटलेली असायची, मजा होती सगळी, आणि हो त्या आधी एक सीमोलंघन हा सुद्धा एक प्रकार असायचा, त्यात आमच्या भुसावळला असलेल्या तापी नदीला जाऊन तिथे बसलेल्या भटजींबरोबर काही तरी पुजा वगैरे करायचो आणि मग सोने वाटण्यास सुरुवात. आता हे काहीच नाहीये, जमल तर काही मित्रांकडे जाऊन सोने देणे वगैरे प्रकार होतो, बाकी काही नाही.


हे सोने देण्यावरुन आठवले, काल बरेच दिवसांनी NDA Road ला गेलो होतो फिरायला तर प्रत्येकाच्या हातात आपट्याची पाने किंवा झाडाच्या फांद्या, मी विचारले की कोणी विकते आहे का तर एक काका म्हणाले की तिकडे बरिच झाडे आहेत आपट्याची, मी तिथे गेल्यावर बघितले, एकाही झाडावर एक पान सुद्धा ठेवले नव्हते, अक्षरश: ओरबाडुन लोकांनी झाडाची लुट केली होती. लोक हाताला लागेल ते घेऊन चालले होते, आता मी काही संत महात्मा नाहीये, हातात लागले असते तर मी पण २-३ फांद्या घेतल्याच असत्या, पण त्रयस्थ पणे विचार केला तर अस वाटत की ते झाड म्हणत असेल च्या आयला तुमचा सण आणि आमचा शिमगा.


हा दसरा काही फार प्रॉमिसिंग दिसत नाहीये कारण दुपारा भरपेट जेवणानंतर ऑफिसला जायचे आहे, असो चालायचेच. तर हा दसरा सर्वांना सुखासमाधाचा जाओ हीच सदिच्छा.

2 comments:

♪♪♥ Prasik ♥♪♪.. ♪♪♥ प्रसिक ♪♪♥........ said...

ते झाड म्हणत असेल च्या आयला तुमचा सण आणि आमचा शिमगा............. खर आहे, असो, दसय्राच्या हार्दिक शुभेच्छा ***

Anonymous said...

SARVANA DASRYACHYA HARDIK SHUBHECCHA