काही लोक म्हणतात की फटाके उडवु नका प्रदुषण होते वगैरे वगैरे, म्हणजे ते खरेच असते पण या लोकांनी त्यांच्या लहानपणी भरपुर फटाके उडवले असतातच ना आणि आता उपदेश करायला मोकळे. आपण काही वेगळा मार्ग नाही शोधु शकत का प्रदुषण रोखण्याचा?, काही झाल की सारख दिवाळीच्या फटाक्यांना काय टार्गेट करायचे?
असो काल गेलो होतो Z ब्रिजला, इथे पुण्यात नदीकाठी भरपुर मोठया प्रमाणात फटाके उडवण्याचा कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम अनेक वर्षांपासुन चालु आहे अस मित्र म्हणाला मी तर पहिल्यांदाच गेलो होतो. अशक्य भारीप्रकारे फटाके उडवले, मी तर एवढ्या मोठ्या प्रमाणात Fancy फटाके उडवण्याचा कार्यक्रम पहिल्यांदीच बघितला. फटाक्यांचे एक असते, ते उडवण्याइतकीच बघायला सुद्धा मजा येते. आणि कालपण खुप मजा आली, पुणेकरांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती. मी त्याचीच एक छोटी विडिओ क्लिप बनवली आहे, ती इथे शेअर करतोय..