आत्ताच रिडिफवर एक आर्टिकल वाचले,
पैसे खर्च करताना आपली कशी मेंटॅलिटी असते त्याचे हे वर्णन आहे आता कोणी या आर्टिकलला चिंधीपणा कसा करावा अस म्हणु शकत, पण काहीही असले तरी त्यांनी यात जे सांगितले आहे त्यात थोडे तथ्य तर आहेच, जस आपण सोडेक्सो फुड कुपन देऊन खरेदी करतो तेव्हाची आपली मेंटॅलिटी आणि जेव्हा आपण रोख पैसे देऊन खरेदी करतो तेव्हाची आपली मेंटॅलिटी, कोणाच्या नसले तरी माझ्या बाबतीत हे खरेच आहे. फुड कुपन देऊन खरेदी करताना मी बरेचदा अनावश्यक खरेदी करतो, रिलायन्स फ्रेशला जाऊन मी कितीदा गरज नसताना जे दिसेल ते घेऊन आलो आहे, तब्बल १७५ रुपये किलोने मिळणारे सफरचंद(!!!), लिची, किवीज आणि अशी अनेक फळे, चॉकलेट्स. कोल्ड्रिंक्स आणि असेच अन्य खाद्यपदार्थ. नशिबाने ते कुपन्स फक्त खाद्यपदार्थांवरच चालायचे नाही तर मी अजुन किती गोष्टी घेतल्या असत्या याला गणतीच नसती.
फुड कुपन्स हा माझ्या पगाराचाच भाग होता, काही पैसे रोख देण्याऎवजी मला ते फुड कुपन्सच्या रुपात मिळत होते आणि ते मी खर्च करत होतो, पण याचा विचार न करता मी त्या फुड कुपन्समुळे बरीच अनावश्यक खरेदी केली होती. जर मला फुड कुपन्स ऎवजी रोख पैसे मिळाले असते तर कदाचित मी तसा खर्च केला नसता, १७५ रुपये किलोने मिळणारे सफरचंद तर नक्कीच नाही.
जी गोष्ट फुड कुपन्सची तीच क्रेडीट कार्डची आणि गिफ्टकुपन्सची सुद्धा, आत्ताच दिवाळीला मी स्वत:साठी आदिदासचे बुट घेतले आणि त्यावर दुकानदाराने मला डिस्काऊंट देण्याऎवजी ५०० रुपयाचे गिफ्ट वाऊचर दिले, आता त्या आदिदासच्या दुकानात ५०० रुपयाची चड्डीपण मिळत नाही, त्यामुळे आता ते कुपन खपवायला मला काहीतरी खरेदी तर करावीच लागेल नाहीतर ते कुपन विकावे तरी लागतील. (डिसेंबर मध्ये Expired होणार आहेत ते, कोणाला हवे असल्यास सांगा मी ते डिस्काऊंट मध्ये देईन!).

असाच काहीसा प्रकार असतो तो काही दुकानांनी चालवलेल्या स्कीम्सचा ,विशेषत: हे रिलायन्स फ्रेश आणि बिग बझार - "सर तुमची खरेदी २७० ची झाली आहे जर अजुन ३० रुपयाची काही खरेदी केली तर तुम्हाला १ किलो साखर फ्री मिळेल", आणि विश्वास ठेवा मी स्वत: डोळ्यांनी पाहिले आहे की लोक ३० रुपयांची अजुन खरेदी करतात त्या फुकट साखरेसाठी. किंवा मॅक डोनाल्डला दोन बर्गर आणि एक फ्राइज सांगितले की - "सर तुम्हाला एक हॅप्पीमील देऊ का ८५ रुपयाचे तुम्हाला त्यावर एक कोक फ्री मिळेल", आणि मग एकाचे दोन हॅप्पी मिल्स होतात, दोन कोक फ्री मिळतात आणि भरपुर कॅलरीजसुद्धा, हे मेगा मार्टला सुद्धा होते, ३ शर्ट्स वर ३ शर्ट्स फ्री, आपल्याला दोन शर्ट्स घ्यायचे असतात पण ३ वर ३ ची ऑफर आपल्या डोक्यात फिरत असते आणि मग आपण तो तिसरा शर्ट घेतो; नको असताना सुद्धा आणि अजुन ३ शर्ट नको असताना सुद्धा आपल्या घरी येतात. आता या फुकट शर्टांची किंमत आपण आधी घेतलेल्या शर्टच्या किमतीत दुकानदाराने आधीच वसुल केली असते हे त्रिकालाभित सत्य माहित असताना सुद्धा बरेच लोक १ शर्ट घ्यायला जातात आणि ६ शर्ट्स घेऊन येतात.
रिडिफमधल्या त्या आर्टिकल मध्ये सांगितल्या सारखे अर्थशास्त्रिय दॄष्टीकोनात पैशाची किंमत ही सारखीच असते, ते पैसे आपल्याला रोख स्वरुपात मिळालेले असो वा अन्य, ५० रुपये हे ५० रुपयेच असतात.
त्यांनी एक उदाहरण खुप भारी दिले आहे, ते म्हणतात जर तुम्ही ४०,००० चे कॉंम्प्युटर घेणार आहात आणि जर तुम्हाला कळले की पुढच्या चौकातल्या दुकानात तेच Computer तुम्हाला ३९,९५० रुपयाला मिळणार असेल तर तुम्ही तिकडे जाल का? आणि जर Computer ऎवजी तुम्हाला जर एक १०० रुपयाचे मेमरी कार्ड घ्यायचे असेल आणि पुढच्या चौकातल्या दुकानात तेच मेमरी कार्ड तुम्हाला ५० रुपयात मिळणार असेल तर तुम्ही जाल का?
आता obviously, पहिल्या option मध्ये पुढच्या चौकात जाणारे लोक खुप कमी असतील पण दुसर्या option मध्ये खुपच कमी लोक (आणि ज्यांना आपण बिनडोक म्हणु शकतो) पहिल्या दुकानातुन मेमरी कार्ड घेतील. लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की दोन्ही options मध्ये ५० रुपयेच वाचणार आहेत.

मला नेहमी प्रश्न पडला असतो की च्या आयला पैसे गेले कुठे? कदाचित थोडा विचार करायची गरज आहे शेवटी थेंबे थेंबे तळे साचे..

2 comments:
सही लिहिलंयस गौरव. एकूणएक मुद्दा पटेश..
धन्यवाद...
Post a Comment