Tuesday, November 30, 2010

Happily Single??


ऑफिस मध्ये single माणसाचे दु:ख समजुन घ्यायला दुसरा single माणुस नसेल तर ऑफिसमध्ये खुप त्रास होऊ शकतो. समविचारी मंडळी ऑफिसमध्ये भेटणे हे भाग्यच म्हणावे लागेल. जर ऑफिसात एखादा सिंगल माणुस (just) Married, would be married आणि टापलेले (याचा संदर्भ नंतर लागेल) यांच्यामध्ये एकटा सापडला तर मात्र त्याची अवस्था बिकट असते. अर्थात तो सुद्धा त्याच मार्गावर कार्यरत असतो पण त्या गोष्टींना बराच वेळ असतो त्यामुळे हा फेज enjoy करायला समविचारी मंडळी बरोबर असणे खुप गरजेचे असते, नाही तर असे प्रसंग घडु शकतात.


प्रसंग १ - 
१ ला कोणीतरी  :- अरे चला ट्रिपला जाऊ या
दुसरा कोणीतरी  :- हो हो नक्की खुप मजा करु नाइट हॉल्टवाली करु
तिसरा कोणीतरी :- नको रे नाईट हॉल्ट, त्यापेक्षा सिंहगडला जाऊ, मी हीला पण सोबत घेतो
टापलेले:- अरे त्या नेहा, पुजा, शिल्पा, मधुराला (most common names) पण बोलवुया ना, म्हणजे कस सगळे Office चे लोक एकत्र असले की बर असते. 
चौथा: - चालेल मी पण आणतो माझ्याहीला, आपण गाड्या घेऊन जाऊ डायरेक्ट वर मस्त पिठले-भाकरी, भजी (etc etc etc).
single: - अरे मला नाही जमणार. माझ्या काकाच्या घरी सत्यनारायणाची पुजा आहे तिकडे जाणे गरजेचे आहे. (हे कारण केव्हाही खपते) 
(मनात :- च्या आयला आता ह्यांच्यात मी गेलो तर काय घंटा मजा करणार आहे सिंहगड ते पण रविवारी म्हणजे जत्राच नको, आणि तिकडे जाऊन काय होणारे, कपल्स त्यांच्यामध्ये आणि टापलेले टापायला, त्यापेक्षा घरी बसुन झोप काढु)


आता टापलेले म्हणजे जे office मधल्या जरा बर्‍या दिसणार्‍या मुलींशी फ्लर्ट करण्याचा चान्सच शोधत असतात, सिंगल माणसाला या गोष्टीत रस नसतो अशातला प्रकार नाही पण सिंगल माणसाची ती प्राथमिकता नसते, कारण त्या साठी ऑफिसमधली मुलगी शोधुन तीला पटवणे, तीच्या मागे मागे करणे, मग ऑफिसातल्या गॉसिपमध्ये आपले नाव येणे आणि मग आपल्या बरोबर असणारे आपल्या मागे बोलायला लागतात वगैरे, वगैरे, खर कोणी सांगितली आहे नसती उठाठेव! त्यापेक्षा आपण आपले बरे.     


प्रसंग २ - 
सिंगल:- अरे चल यार ते काम आज संपवुन टाकु, बसु थोडे लेट
Married /would be married:- अरे आज नको, आज संध्याकाळी हीला घेऊन जायचे आहे, किंवा यार आज तीला भेटलो नाही तर ती जीव घेईल, आपण अस करु उद्या येऊ २-३ तास आणि संपवुन टाकु.
सिंगल:- अरे पण उद्या शनिवार आहे, सुट्टी असते.
Married /would be married:- अबे तुला कशाची सुट्टी, तस पण तुला काय काम असते घरी जाऊन लग्न नाही काही नाही, चल ये उद्या.
सिंगल: -%$$#$#@@##@@#&^@^^#@&


प्रसंग ३ -
सिंगल:- चल रे ६ वाजले निघुया घरी, मला सोड आज मी गाडी नाही आणली
टापलेला:- अरे आज नाही जमणार, थोड काम आहे
सिंगल:- च्या आयला भोXXX, ४ वाजेपासुन फेसबुकवर चकाट्या पिटतोय आणि ६ वाजता काम सुचतय का तुला भाXXX.
टापलेला:- अरे आज तीला (म्हणजे नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणाला) थोडी मदत करायची आहे ती लेट सिटिंग करणार आहे मग मी पण थोडी मदत करतो तीला, मला ते काम माहिती आहे blah blah blah...


प्रसंग ४ - 
नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणीतरी:- ए चला आपण तो ब्रेक के बाद बघुया, इमरान काय क्युट दिसतो त्याच्यात!
सिंगल: - त्यापेक्षा आपण Unstoppable बघु
नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणीतरी: - ई ई ई तो केवढा व्हायोलंट आहे
टापलेला:- चालेल ब्रेक के बादला जाऊया चांगला वाटतोय, (सिंगलकडे बघुन) अरे चल ना अरे काय सारखे Action movies बघायचे
सिंगल:- अरे शनिवार आहे Shyaa विसरोलोच होतो, अरे सॉरी यार नाही जमणार मला गाडी सर्विसिंगला टाकायची आहे आणि संध्याकाळी माझ्या मावस बहिणीकडे जायचे आहे ती बर्‍याच दिवसांपासुन बोलावते आहे. You guys have fun! (मनात:-  च्या आयला ब्रेक के बाद, काय चाललय या जगात वाचव रे देवा)
नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणीतरी: - अरे हा नेहमीच नाही म्हणतो, मागे सिंहगडला पण आला नव्हता
सिंगल:- हे हे हे अरे येतो नक्की पुढच्यावेळेस. (वाट बघा)


प्रसंग ५ - 
(आता प्रत्यक्ष) सिंगल:- ए चला आपण तोरण्याला जाऊया बेस्ट सिजन आहे खुप मजा येईल, सकाळी जाऊन संध्याकाळी परत
नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणीतरी:- ए हो चालेल
नेहा, पुजा, शिल्पा, मधुरा पैकी कोणीतरी:- अरे नाही जमणार
Married:- अरे नको, कुठे गड किल्ले चढत बसायचे
Would be married :- नाही रे मला हीला पिक्चरला घेऊन जायचे आहे.
टापलेले:- अरे सगळे जाणार असतील तर जाऊ, नाही तर जाऊदे ना तिकडे च्या आयला जेवणाचे पण वांदे असतात (आणि ती पण  येत नाहीये).


तर अशाप्रकारे बिचारा सिंगल एक एक दिवस मोजत असतो, या आशेमध्ये की कोणीतरी पावटे सिंगल पोर येऊन तो त्यांच्याबरोबर ग्रुप बनवुन मजा करु शकेल. अर्थात सिंगलची परिस्थिती एवढी वाईट नसते, त्याला Office च्या बाहेर ढीगाने पावटे मित्र असतात आणि तो त्यांच्या बरोबर खुप मजा करत असतो, पण ऑफिसमध्येच जर अजुन समविचारी मित्र मिळाल्यास सिंगलची काही हरकत नसते. हे सर्व झाले तरी ह्या मॅरिड पोरांचे कौतुक वाटते एवढा सगळा संसाराचा गाडा का काय म्हणतात ते सांभाळुन ऑफिसची कामे करतात आणि हो आमच्या सारख्यांना मदत सुद्धा.

12 comments:

sukameva said...

एकदम मस्त! सही वर्णन केले आहे. माहितीतले टापलेले डोळ्या समोर आले :)

हेरंब said...

भन्नाट चाललीये टापाटापी.. हेहे.. तू कुठल्या ग्रुपमधला? ;)

yog said...

sahi sahi....
typical reverse situation in our office.
cricket..6 ppl ready, 2 r uncomfortable, 1 nt considered

trekking..nt like much bt movie plan continues to superhit..

Gaurav said...

@ सुकामेवा:- कमेंट साठी आभार, टापलेले प्रत्येक ऑफिसात सापडतातच..

Gaurav said...

@ हेरंब:- हे हे सध्या तरी मी सिंगल्स मध्येच खेळतोय..

Gaurav said...

@ योग:- इथे क्रिकेट बाबतीत उदासीनताच आहे, आणि अगदी ट्रेक म्हणजे सिंहगड जास्तीत जास्त पुरंदर बास! आणि मुवी तर विचारायलाच नको..

Maithili said...

:-D :-D :-D
Sahiye...!!! :-)

स्वप्ना said...

@गौरव :झक्कास झालंय.पण हि अवस्था फक्त मुलांचीच असते असा नाही मुलींची पण तीच अवस्था असते.सिंगल असलेल्या दोघी-तिघी कुठेतरी जाऊ ठरवतात तर लग्न झालेल्या नको ग बी,एक सुट्टी मिळते,काम किती असतात,सासर कडची मंडळी यायचीयेत वगैरे वगैरे,,,,,,
असो
मस्त झालंय पण लेख!!

Gaurav said...

@ मैथिली:- :D

Gaurav said...

@ स्वप्ना:- कमेंट बद्दल thanks!
खरच.. प्रॉपर ग्रुप नाही मिळाला तर बोंबच असते ऑफिसमध्ये..

आदित्य चंद्रशेखर said...

मस्त रे गौरव, एकदम माझ्या मनातलं लिहिलंस! आमच्या ऑफिसमधेही असंच आहे... पण कुणी टापलेलेच नाहीयेत... हिरवळच नाहीये ना! मी सिंगल होतो तोपर्यंत लेटनाईट बसायचो.. आता 'would be' आहे, त्यामुळे 'ती'च्याशी फोनवर बोलता यावं म्हणून लवकर निघता तरी येतं!

गायत्री said...

Mastch....!!