Saturday, December 11, 2010

Thanks Sachin!





आजच्या times ला बातमी होती की सचिनने एका मद्यविक्रेत्या कंपनीचा आलेला २० करोड रुपये प्रतिवर्षाचा करार अमान्य केला. ही बातमी वाचुन कोणाला आश्चर्य वाटायचे कारण नाही कारण त्याने ती offer मान्य केली आहे अस कोणी सांगितले जरी असते तरी त्यावर कोणीच विश्वास नसता ठेवला, कारण तो तस करुच शकत नाही. सचिन ikon आहे, प्रत्येकजण, तो कोणत्याही क्षेत्रातला असो, तो सचिनकडे नेहमीच एक आदर्श म्हणुन बघत असतो, आणि हे त्याला माहिती आहे. जरी सचिन करोडोंचा मालक असला तरी सुद्धा २० करोड रुपये ही काही लहानसहान रक्कम नाहीये. 

तो करार सचिनने केला जरी असता तरी त्याला कोणी काही म्हणु शकले नसते, कारण तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सचिन म्हणुनच वेगळा आहे. त्याला माहिती आहे, इथे त्याचे करोडो चाहते आहेत, आणि ते त्याचे अनुकरण करतात, सचिन पेप्सी पितो म्हणुन लाखो पेप्सी पितात केवळ सचिनमुळे, लोक कोलगेट टोटल टुथपेस्ट घेऊ लागले कारण सचिन ती वापरायचा, एवढेच नाही, तर फिएट पॅलिओचा एका कारचा खप केवळ सचिन ऍड करतो म्हणुन वाढला, मला तर हे सुद्धा वाटते की गाडीला नविन टायर टाकायचे असले तरी लोक, अरे ते MRF चे टायर टाक म्हणत असतील, अर्थात MRF चांगला ब्रॅंड आहे पण सचिन MRF चा लोगो बॅटवर लावतो त्यामुळे त्यांची विक्री वाढलीच असेल यात वाद नाही. TVS Victor तर लोकांनी केवळ सचिनमुळे घेतली आहे, हे मी खात्रीपुर्वक सांगु शकतो कारण माझ्याच ओळखीतल्या काही लोकांनी ती या कारणाने घेतली आहे.

ही जाहिरातदार मंडळी काही वेडी नाहीत की एवढ्या रकमा देऊन प्रसिद्ध व्यक्तींशी करार करतील, लोकांनी कितीही काहीही म्हंटले तरीसुद्धा ती Brand Conscious असतातच, हे त्या जाहिरातदारांना माहिती असते आणि हो प्रसिद्ध व्यक्तींनासुद्धा. तरीपण किती प्रसिद्ध व्यक्ती याचा विचार करतात, एक सचिन आणि दुसरा (कोल्ड्रिंकच्या जाहिरातीस नकार देणारा) पुलेला गोपीचंद सोडला तर? परवाचीच बातमी की आपल्या धोनीने याच कंपनी बरोबर तब्बल २९ करोड रुपयांचा करार केला तो सुद्धा ३ वर्षांसाठी, आणि आपल्याच टीममधले गंभिर हरभजन मंडळी Have I made it big म्हणुन कशाची जाहिरात करतात हे काही वेगळे सांगायला हवे का?

त्या बातमीतला एकच Para सचिनचे वेगळेपण दाखवण्यास पुरेसा आहे 
"former player who is also close to Tendulkar said the maestro is living up to the promise he made to his father Ramesh Tendulkar many years ago. His father had advised him against endorsing alcohol-related or tobacco products soon after he had made the Indian Test team.  "

2 comments:

Sagar Kokne said...

सचिन तर सचिनच...अतुलनीय...अद्वितीय

Sagar Kokne said...
This comment has been removed by the author.