Wednesday, December 29, 2010

लक्ष्मण - The (Very very special) Saviour


रामायणामध्ये पण मेन हिरो रामच असल्याने त्याला रामायणच म्हणतात पण लक्ष्मणाचा रोल रामाइतकाच महत्वाचा होता(आता Please काही धार्मिक भागात जाऊ नका), काळ बदलला तरी आजचा वांगिपुराप्पु वेंकट साई (VVS) लक्ष्मण आणि कालचा लक्ष्मण यांना नेहमी Side Hero म्हणुनच ट्रीट केले जाते.

मला माहित नाही पण खरच VVS लक्ष्मण साईड हिरो आहे का मेन हिरो?  कितीदा म्हणजे आता बोटावरही मोजता येणार नाही इतक्यांदा लक्ष्मणाने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन रन बनवले आहेत आणि एखादा अशक्य विजय खेचुन आणला किंवा गेलेली मॅच वाचवली किंवा मानहानीकारक पराभवाला एका लढाऊ पराभवाचे रुप दिले. आणि तरी पण तो साइड हिरोच?? No Sir!!

लक्ष्मण तसा होता टीम मध्ये पण १९९९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सिडनी टेस्ट मध्ये त्याने काढलेल्या १६७ धावा हा एक डोळ्यांचे पारणे फिटवुन टाकणारा परफॉर्मन्स होता, त्यावेळेस मी शाळेत होतो नववीत आणि मला आठवतेय की तो परफॉर्मन्स बघुनच मी शाळेत गेलो होतो कारण लगेचच मॅच संपली, मॅक्ग्रा, वॉर्न आणि ब्रेटलीवर लक्ष्मणने जो हल्ला चढवला होता त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. काय टायमिंग.. काय प्लेसमेंट... ती मॅच आपण घालवलीच होती पण लक्ष्मणच्या खेळीचे महत्त्व त्याने कमी होत नाही. मग आलेल्या २००१ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबद्दल तर सर्वांना माहितच आहे माझी तर त्या मॅचची पारायणेच करुन झाली आहेत, फॉलोऑन-लक्ष्मणची अप्रतिम खेळी-द्रविडचा Gutsy performance-भज्जीची फिरकी, ते गिलस्पीचे लक्ष्मणचे लक्ष विचलीत करण्यासाठी हात पसरवुन बॉलिंग टाकणे आणि त्या चेंडुवर लक्ष्मणने चौकार ठोकणे हे इतक्या दिवसांनी अजुनसुद्धा डोळ्यासमोर आहे. मला तर भारतीय टीमच्या आत्तापर्यंतच्या खेळाचे दोन भागात विभाजन करता येईल अस वाटत भाग पहिला म्हणजे २००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेच्या कोलकाता टेस्ट मॅचच्या आधीचा आणि एक म्हणजे त्यानंतरचा. ही अतिशयोक्ती वाटु शकेल काहींना पण त्या लक्ष्मणच्या खेळीने जो भारतीय टीमला आत्मविश्वास दिला त्याला तोड नाही.

मला लक्ष्मणवर बर्‍याच आधीपासुन पोस्ट टाकायची होती, खरतर आत्ता झालेल्या ऑस्ट्रेलिया बरोबरच्या मालिकेत झालेल्या त्या अटितटीच्या सामन्यापासुनच जेव्हा ईशांत शर्मा आणि प्रग्यान ओझाला हाताशी धरुन लक्ष्मणने तो ऑस्ट्रेलियाच्या अन्ननलिकेतला घास खेचुन काढला होता (हो हो तीच मॅच जेव्हा लक्ष्मण प्रग्यान ओझाला बॅटने मारायला निघाला होता) मग ते राहुनच गेल मग पुन्हा जेव्हा न्युझिलंडच्या खिशातली मॅच त्याने पुन्हा तळातल्या फलंदाजांना हाताशी धरुन वाचवली तेव्हा पण ते  राहुनच गेले. पण आता मात्र त्याने कमालच केली ज्या खेळपट्टीवर कोणताच फलंदाज साधी चाळीशी गाठु शकत नव्हता त्यावर त्याने ९६ धावा चोपल्या आणि पहिल्या डावातल्या ३८ धावादेखील महत्त्वाच्या होत्या. मानलच बॉस लक्ष्मणला तोड नाहीच.

लक्ष्मणचे बरेच बॅडलक आहे त्याच्या क्रमांक ५ आणि ६ वर बॅटिंगवर येण्याने त्याच्या शतकांची संख्या तशी मर्य़ादीतच राहिली कारण तो अनेकदा ६०-७० रनांवर नाबाद राहिला आहे कारण बरोबरचे सगळे आऊट होऊन गेले. आकडेवारीने गेलो तर एक चांगला खेळाडु म्हणुन त्याची नोंद होईल पण आकडेवारीच्यापलीकडे गेलो तर त्याला महान खेळाडुंमध्येच स्थान द्यावे लागेल.

(pic from google)

1 comments:

Sagar Kokne said...

सहमत....आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर भन्नाटच रेकॉर्ड आहे त्याचा...