Wednesday, January 26, 2011

तारा पान सेंटर

औरंगाबादला किंवा संभाजीनगराला नेहमीप्रमाणे Audit ला गेलो होतो तर तिथे आधीपासुन असलेल्या लोकांकडुन एका पानाच्या दुकानाबद्दल ऎकले "तारा पान सेंटर", की बुवा इकडे खुपच अप्रतिम पान मिळते, लोक पॅक करुन दुसर्‍या गावांना वगैरे घेऊन जातात, हे सगळे ऎकल्यावर माझी उत्सुकता चाळवली आणि सुदैवाने त्या दुकानात जायचा देखील योग आला.



दुकानात गेल्यावर तिथल्या मालकाने लाल रंगाने माखलेल्या कपड्यात आमचे स्वागत केले, आणि अचानक ६ लोक दुकानावर आल्याने एक मोठी पार्टी आली आहे असा त्याला अंदाज आला, त्यामुळे आल्या आल्याच त्याने आम्हाला एक चॉकलेट+मावा+इतर अश्या टाइपचा एक पदार्थ खायला दिला जो एक नंबर होता, आणि मग आम्ही तिथले स्पेशल मघई मसाला पान खाल्ले एक खाऊन कोणाचेच समाधान झाले नाही त्यामुळे प्रत्येकाने किमान २ पान खाल्लीच आणि शिवाय पार्सल घेतली ती वेगळीच. मी पानांचा खुप शौकीन नाही, मला त्यातले फारसे कळत नाही, पण इथल्या पानाची चव अविस्मरणीय होती, ते पान तोंडात टाकल्यावर विरघळुन गेले, वाह मजा आ गया! क्या बात है या व्यतिरिक्त कोणाच्या तोंडातुन बाकी काही बाहेरच पडले नाही. आणि अशाप्रकारे आम्ही जवळपास रुपये १००० किमतीच्या पानांची खरेदी करुन बाहेर पडलो, आणि दुर्दैवाचा भाग असा की मी माझा १ पानांचा पार्सल घेतलेला डबा गाडीतच विसरलो. असो जो कोणी औरंगाबादला जाणार असेल त्याने इथले पान नक्की खावे आणि आठवणीने घेतलेले पार्सल परत आणावे.
 

Menu Card

Masala Paans

Inside- Making of a Paan

Making of a Paan contd..

Maghai Masala Paan

Parcel
 

2 comments:

नागेश देशपांडे said...
This comment has been removed by the author.
नागेश देशपांडे said...

Ek number...

I miss Tara Paan Center and Aurangabad.

Thank you for post on this shop.