Wednesday, February 23, 2011

मॉरिशस-मॉरिशस


परवाच मित्रांबरोबर बसलो होतो, तेव्हा विषय निघाला की बॉस हा काहीपण घोटाळा झाला तर मॉरिशसचे नाव कस काय येते? IPL घोटाळा - मॉरिशस, 2G घोटाळा - मॉरिशस, CWG चा घोटाळा - मॉरिशस आणि या आधी सुद्धा जे काही घोटाळे झाले त्यातपण मॉरिशसचेच नाव येते.. काय सीन काय आहे हा मॉरिशसचा?आता मॉरिशसला टॅक्स हेवन अस सुद्धा म्हंटल जाते हे अनेकांना माहिती आहे पण तिथे नेमके अस काय आहे हे अनेकांना माहित नसते, विशेषत: Non Financial वाल्या लोकांना तर याची गंधवार्तासुद्धा नसते.

या साठी थोडी income tax ची माहिती करुन घ्यावी लागेल. भारतीय income tax नुसार, कोणत्याही भारतीय व्यक्तीच्या कुठेही होणार्‍या (भारतात किंवा भारताबाहेरच्या सुद्धा) कमाईवर कर आकारण्याचा अधिकार हा भारत सरकारकडे आहे, तसेच परदेशी व्यक्तींच्या भारतात होणार्‍या कमाईवरसुद्धा कर आकारण्याचा आकार भारत सरकार कडेच आहे. यासाठी आपण खालील चित्र बघु शकतो, जिथे आपल्या राजुचे भारतातल्या तसेच भारताबाहेरच्या कमाईवर भारत सरकार करवसुली करु शकते, पण इतर देशांमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे, म्हणजे इतर देशसुद्धा त्यांच्या देशात होणार्‍या कमाईवर कर लावु शकतात, यामुळे होते काय की एकाच Income वर दोन्ही देशांमध्ये कर लावला जातो, यालाच म्हणतात "Double taxation". हे टाळण्यासाठी भारत सरकारने इतर राष्ट्रांबरोबर "Double tax avoidance agreement (DTAA)" केले आहेत, ज्यानुसार एखाद्या कमाईवर कोणत्याही एकाच देशात टॅक्स लावता येतो.



आता मॉरिशस आणि भारतामध्ये असणार्‍या "DTAA" नुसार, मॉरिशस मधल्या कंपन्यांच्या भारतातल्या Capital gains वर (मालमत्तेच्या (शेअर सुद्धा) खरेदी-विक्रीवर होणार्‍या नफ्यावर) कर आकारण्याचा अधिकार हा मॉरिशसकडे असणार आहे, म्हणजे भारतात या Capital gains वर काहीच टॅक्स लागणार नाही.

उदा. १० रुपयाचा शेअर घेऊन तो १०० रुपयास विकला तर ९० रुपये जो नफा होतो त्याला Capital gain अस म्हणतात ज्यावर भारतात १० ते ४० टक्क्यांपर्यंत टॅक्स लागु शकतो.

यात मेख अशी की मॉरिशसमध्ये Capital gains वर काहीही टॅक्स नाहीये त्यांच्याकडे Capital gains tax नावाची संकल्पनाच अस्तित्वात नाहीये. त्यामुळे मॉरिशसमध्ये असणार्‍या कंपन्यांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणुक करुन शेअर विक्रीकरुन नफा कमावला तर त्यांना त्याच्यावर टॅक्सच नाहीये, आणि फक्त शेअर बाजारातच नाही तर इतर कंपन्यांच्या शेअर विक्रीवर होणार्‍या नफ्यावरसुद्धा या कंपन्यांना काहीच टॅक्स नाही. (खालील चित्रात दिलेले उदाहरण बघु शकतो). यात आपल्याला अस दिसु शकते की अमेरिकेतील एखादी कंपनी मॉरिशसमध्ये कंपनी स्थापुन त्या द्वारे भारतात गुंतवणुक करु शकते आणि गुंतवणुकीवर होणारा नफा, कर न भरता अमेरिकेत परत घेऊन जाऊ शकते.






मॉरिशसमध्ये कंपनी स्थापन करणे अतिशय सोपे आहे त्यामुळे जवळपास सगळ्याच MNCs ची मॉरिशस मध्ये कार्यालये आहेत जिथुन या कंपन्या भारतात गुंतवणुक करतात, या कंपन्यांना मॉरिशसमध्ये प्रत्यक्ष काही कारभार असणे गरजेचे नाही, त्यामुळे यातल्या बर्‍याच कंपन्या On paper च आहेत, ज्यांचे एकच काम म्हणजे भारतात पैसा गुंतवणुक करणे. आता ही गोष्ट सरकार किंवा कोणाला माहित नाही असे नाही, आणि या गोष्टीविरुद्ध कोणी आवाज उठवला नाही अस सुद्धा नाही, आझादी बचाओ आंदोलन या नावाखाली येऊन काही लोकांनी सुप्रिम कोर्टात या DTAA ला आव्हान दिले होते की या DTAA चा फायदा देशाला होत नसुन बाहेरचे देशच याचा फायदा करुन घेत आहेत, पण सुप्रिम कोर्टाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला आणि अजुनही या DTAA चा फायदा अनेकजण घेत आहेत.


अस म्हणतात की सरकारने मुद्दामच या DTAA मध्ये अशा तरतुदी केल्या आहेत कारण त्यामुळॆ भारतात परकीय गुंतवणुकीस चालना मिळेल, पण याचा वापर लोक आपल्या black money ला white करण्यासाठी आणि करचुकवेगिरी साठी ज्याला tax planning चे नाव दिले जाते या साठी करतात हे जवळपास सर्व घोटाळ्यांमध्ये मॉरिशसच्या कंपनीच्या सहभागाने स्पष्टच होते. असो नविन येणार्‍या Direct tax code मध्ये या गोष्टीस आळा घालण्याच्या संदर्भाच्या काही तरतुदी आहेत अस ऎकुन आहे, बघु काय होते ते..

(Note:- ही पोस्ट एक general information म्हणुन लिहिली आहे त्यामुळे जर अधिक माहिती हवी असेल तर Income tax act वाचा :) )

3 comments:

Sagar Kokne said...

छान माहिती आहे...काळा पैसा कमावणार्‍यांना फायद्याचे आहे.

Gaurav said...

ani fukat suddha :P

yog said...

IT act madhe anek chorwata distat. long term cg , transfer pricing , dividend stripping ajun kay kay. Hope proposed DTC will be hiked to unsubtle tax evasion ..