Monday, May 2, 2011

दोन महिने

जवळपास दोन महिने झाले ब्लॉगकडे बघणेच झाले नाही, या दोन महिन्यात एवढे काम केले (किंवा करुन घेतले) याला काही सीमाच नव्हती. उभी आडवी लागणे म्हणजे काय याचा प्रत्यय अनेकदा आला. हे भारतात फार आहे, काहीच्या काही डेडलाईन्स सेट करतात आणि स्टाफकडुन कुत्र्यासारखे काम करुन घेतात. (कुत्रा काही काम करत नाही तरीपण हा बर्‍यापैकी प्रचलित वाक्प्रचार आहे :p). वर्ल्डकपच्यापण अगदी मोजक्याच मॅचेस बघता आल्या. मला तर फायनलच्या दिवशीसुद्धा काम करायला पाठवले हे म्हणजे अगदी अतीच झाले मी अर्ध्यातुन पळुन आलो तो भाग वेगळा, पण या लेट सिटिंगमुळे वैताग आलाय पण कुठेही गेलो (भारतात) तरी हे असतेच आणि कोणी या बद्दल कंप्लेंट केली तर "मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है" ही अशी काही वक्तव्ये ऎकावी लागतात.

हे दोन महिने संस्मरणिय झाले, मुख्य म्हणजे आपण जिंकलेला वर्ल्डकप, आजच मी माझ्या जुन्या फेसबुकच्या अपडेट्स वाचत होतो म्हणजे २ महिन्यापुर्वीच्या, त्यात पुन्हा आठवण झाली, आयर्लंडच्या इंग्लंडवरच्या विजयाची, इंग्लंडशी झालेल्या टाय ची ज्यात झहिरला सुरुवातीला खुप फटके बसले होते आणि नंतर झहिरनेच ती मॅच खेचली होती, पियुष चावलाला वाहलेल्या शिव्या, नंतर आफ्रिकेविरुद्धच्या मॅचची ज्यात नेहराला आख्ख्या फेसबुकने शिव्या घातल्या होत्या, ऑस्ट्रेलियाला आपण तुडवल्याची अपडेट, युवराज पॉंटिंगच्या पार्श्वभागावर बॅट मारतोय हा फोटो तर सगळ्यांनीच लावला होता, पाकड्यांनी सोडलेल्या सचिनच्या कॅचेसची अपडेट आणि नंतर श्रीलंकेला हारवुन वर्ल्डकप जिंकल्याची अपडेट, सचिनच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंची अपडेट, धोनीच्या कमालीच्या कप्तानीची अपडेट, युवराजमधल्या अशक्यप्राय बदलाची अपडेट आणि अशा अनेक अपडेट्स, आज तर मला पुन्हा वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला आनंद पुन्हा झाला.


या दोन महिन्यात घडलेली अजुन एक (दुर्दैवी) घटना म्हणजे माझे चेन्नईला जाणे, शहाण्या (मराठी) माणसाने चेन्नईला जाऊ नये, अरे केवढा भात खातात तिकडे लोक, काही option च नसतो तिकडे, पहिला भात, मधला भात, शेवटचा भात आणि नंतर दही भात हे अस रोज खातात, नाश्त्यालासुद्धा ते पोंगल म्हणजे भातच खातात, मी खुप वैतागलो होतो तिकडे, इडली डोसा खर तर माझ्या आवडीचे पण आता माझी अजिबात इच्छा होत नाही ते खायची, आणि तिथे भाषेचा एवढा मोठा issue आहे की विचारायची सोय नाही. चेन्नईला सर्वणाभवनची फिल्टर कॉफी आणि तिथे सकाळी मिळणारा स्वीट पोंगल मात्र कायमचा लक्षात राहिल. बाकी चेन्नई मला बोअरिंग वाटले, तिकडे तर लोकलला सुद्धा काहीच गर्दी नव्हती संध्याकाळी ७ वाजता लोकलमध्ये सगळे लोक बसुन प्रवास करत होते हे बघुन तर फारच मोठा धक्का बसला. मराठी माणसाचे चेन्नईला जाऊन राहणे मला तर कठिणच दिसते. तिकडे मला काही कोलकात्याहुन आणि दिल्लीहुन आलेली मंडळी भेटली, त्यांची अवस्था खरच दीनवाणी होती, तिथे नॉर्थ इंडिअन जेवण मिळत नाही अस नाही पण खर सांगायचे तर तिकडच्या लोकांनी नॉर्थ इंडिअन बनवण्याच्या फंदात न पडलेले चांगले. चिकन चेट्टिनाड आणि आप्पम मात्र तिकडे जाऊनच खाण्यासारखे आहे. तिकडच्या मरिना बीचवर जाऊन मी भेळ आणि पावभाजी खाण्याचा गाढवपणा केला, इतकी वाईट भेळ आणि पावभाजी मी या पुर्वी कधीच खाल्ली नव्हती. या अशा ठिकाणी जाऊन आल्यावर आपला महाराष्ट्र केवढा अप्रतिम आहे याचा साक्षात्कार होतो, पुण्यात आल्यावर लगेचच मी वडापाव आणि मिसळपावावर ताव मारला आणि मुख्य म्हणजे पोळी खाल्ली. पोळी खाल्ल्यावर एवढा आनंद मला कधीच झाला नव्हता.

Sarvana Bhavan chi Filter Coffee
वर्ल्डकप संपला आणि IPL सुद्धा सुरु झाले, खरतर या वेळेचच्या IPL ला काही फार मजा येत नाहीये, मलिंगाला बघुन तर असे वाटते की जर त्याने आत्ता जशी टाकतोय त्याच्या ८०% बॉलिंग जरी फायनलला टाकली असती तरी आज श्रीलंका वर्ल्डकप जिंकली असती. काय मला कळतच नाही, एकतर यावेळेस त्यांनी गांगुलीचा पण गेम केला त्यामुळे मला तसापण फार इंटरेस्ट उरला नाही IPL मध्ये, आणि पुण्याच्या टीमने जो काही हाराकिरीचा सपाटा लावला आहे त्यामुळॆ तर IPL बघण्याचा उरलासुरला उत्साहसुद्धा चालला गेला.



आजतर हाईटच झाली, ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानात त्याच्या घरात घुसुन मारले, साला याला म्हणतात बदला, कुत्र्यासारखे मारले(!!!), आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे त्याला मेल्यावर समुद्रात बुडवुन टाकले, म्हणजे तो मेल्यावर उगाच त्याच्या समाधीलापण काही महत्त्व नको यायला, आपल्यासारखे नाही साला जो मेला त्याचे बांध थडगे, कटकटच नको बुडवला त्याला समुद्रात. भारताला म्हणाव शिका काही यातुन नाहीतर आपण आहोतच पाहुणाचार करण्यात आघाडीवर.



आणि हो सांगायचे तर राहुनच गेले माझ्या ब्लॉगला (२ महिने अपडेट न करतासुद्धा) तब्बल १०,००० च्यावर लोकांनी भेटी दिल्या, हे तर म्हणजे खरच आश्चर्यचकित करण्यासारखे आहे, माझ्या मित्रांच्या मते मीच वेगवेगळ्या ठिकाणुन लॉगिन करुन माझ्या ब्लॉगवर क्लिक करतो, असो प्रसिद्धी बरोबर टीकासुद्धा येतेच :D.. jokes apart पण मला कधीच वाटले नव्हते की एवढी लोक माझ्या ब्लॉगला भेट देतील, मब्लॉविचे आणि सर्व वाचकांचे मन:पुर्वक आभार मानतो आणि हे माझे २ शब्द संपवतो.

3 comments:

mynac said...

"आणि हो सांगायचे तर राहुनच गेले माझ्या ब्लॉगला (२ महिने अपडेट न करतासुद्धा) तब्बल १०,००० च्यावर लोकांनी भेटी दिल्या, हे तर म्हणजे खरच आश्चर्यचकित करण्यासारखे आहे,"
गौरव खरं तर हा तुझा मोठा गौरव आहे नि अगदी १०००० ह्या आकड्याने तुझ्या व्यवहारे ह्या आडनावातील व्यवहारी नोंदीला तू छान लक्षात ठेवले.मस्त.:) कुठे हि गेलास तरी तुझ्यातला पुणेकर जागाच आहे:)

Gaurav said...

Hahaha.. Thanks for commenting...

Atul Deshmukh said...

mast lihitos re mitra...हे भारतात फार आहे, काहीच्या काही डेडलाईन्स सेट करतात आणि स्टाफकडुन कुत्र्यासारखे काम करुन घेतात. (कुत्रा काही काम करत नाही तरीपण हा बर्‍यापैकी प्रचलित वाक्प्रचार आहे :p).
he tar apratim hote...