एक तर ऑफिस मध्ये सुंदर मुली खुप कमी असतात आणि असल्या तरी त्या आपल्या टीम मध्ये कधीच नसतात आणि एवढ सगळ करुन जर त्या असल्या तर आपण एकटेच थोडेच असतो टीम मध्ये आपल्या सारखे १७ असतात पण सुंदर मुलगी एकच असते त्यामुळे ते प्रमाण १:१७ असे होते आणि त्यामुळॆ आपला नंबर लागण्याची सुतराम शक्यता नसते, कारण... कारण काही नसते, यापुर्वी असे कधी घडले नाहीये त्यामुळे याच्यापुढे सुद्धा अस काही घडण्याचा चान्सच नाहीये.
एक गोष्ट बरेचदा दिसुन येते, ती म्हणजे सुंदर मुलगी असली की टीममधला हुषारातला हुषार मुलगा सुद्धा डोक गहाण टाकल्यासारखा वागत असतो किंवा तो उगाचच शो ऑफ करायला लागतो, की मला हे येते, मला ते येते मी हा आहे, मी तो आहे, वगैरे वगैरे, त्याला म्हणावेसे वाटते अरे हो असशील तु भारी पण इतके दिवस का नाही बोललास आजच का सुचतय सगळ? टीमचे सोडा (आयला आम्हाला येत असते तर आम्हीपण तेच केले असते) पण मॅनेजरने पण डोके गहाण टाकावे म्हणजे काय? मुलगी सुंदर असली म्हणुन काय झाले अरे ती बिनडोकपणाने काम करतेय मग सांग की तीला आमच्यावर कसा चढतोस चुका केल्या की आणि आमच्या चुका, चुका आणि तीच्या चुका म्हणजे "It can happen sometimes??" आणि का तर म्हणे की आम्हाला लाडात बोलता येत नाही "Oh how dumb of me" म्हणुन.. आयला हे बरय.
या गोष्टीचा साधा निषेध पण करता येत नाही, कारण निषेध कोणाजवळ सांगायचा इथे सगळेच फितुर असतात इथे आपण काही बडबड केली की लगेच तीच्या कानापर्यंत पोहोचते आणि तीच्याशी पंगा घेणे काही परवडणारे नसते कारण इथे छातीठोकपणे आपल्या बाजुला कोणी उभे राहणारे नसते (मॅनेजर पण नसतो) . आणि आपणही का पंगा घ्या?, इतके दिवस टीममध्ये चांगली पोरगी नाही म्हणुन बोंब मारायची, मॅनेजरला शिव्या घालायच्या की च्या आयला त्या फालतु XYZ पेक्षा ती item तरी टीममध्ये घ्यायची होती ना आणि आता तीला घेतली टीममध्ये की अशी बोंब.
सुंदर पोरगी जर टीममध्ये असेल तर टीमची efficiency मात्र वाढते कारण लेट सिटिंग करायला सगळेच उत्सुक असतात (विशॆषत: जे तीच्या घराजवळ राहतात), माझ्या एका मित्राला त्याच्या मॅनेजरने तर खुल्ला सांगितले होते की अरे यार एखादी चांगली दिसणारी पोरगी टीममध्ये घेऊ टीम मधल्या मुलांचाही उत्साह वाढेल आणि आपले काम सुद्धा वेळेवर (भरपुर लेट सिटिंग होऊन) पुर्ण होईल म्हणजे याच्यात सुद्धा कंपनी आपला अजेंडाच पुढे सरकवत असते.
असो पण यात काही त्या सुंदर मुलीचा दोष नसतो, उलट तीला तर भरपुर त्रास असतो, तीच्या मागे १७ पोर (including Manger) असतात आणि वरुन टीममधल्या सामान्य दिसणार्या मुलींचे जळणे हे आलेच आणि एवढे सोसुन सुद्धा काम पुर्ण करणे, हे काही फार सोपे नसते.
एवढे सगळे जरी असले तरी त्या सुंदर मुलीला (नेहमी) एक खुपच भारी बॉयफ्रेंड असतो, ज्याच्याशी आपली काहीच तुलना होऊ शकत नाही, जो cool dude असतो, त्याच्याकडे हायाबुसा किंवा होंडा सिटी असते, ज्याचा बाप श्रीमंत असतो, त्याच्या आणि आपल्या पगारात जमिन आस्मानाचा फरक असतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो तीचा बॉयफ्रेंड असतो त्यामुळे नेहमीप्रमाणे आपली द्राक्ष आंबटच निघतात आणि आपण पुन्हा कोण मुलगी टीम मध्ये येतेय याची वाट बघत बसतो.










6 comments:
एकदम जबराट...
सेम अनुभव यार... सर्वीकडे 'त्यांची demand जास्त आणि supply कमी यार..pure economics...
हो सगळीकडे सेम सीन आहे
मी तर कधी कोणत्या मुलीच्या फंदात पडत नाही...करियर महत्त्वाचे!
खरंय मित्रा... १०० % खरा आणि सार्वत्रिक की काय (म्हणजे बहुतेक मराठीत युनिवर्सल) म्हणतात ते सत्य लिहिलयस... जबरी ..
खरंय मित्रा... १०० % खरा आणि सार्वत्रिक की काय (म्हणजे बहुतेक मराठीत युनिवर्सल) म्हणतात ते सत्य लिहिलयस... जबरी ..
खरंय मित्रा... १०० % खरा आणि सार्वत्रिक की काय (म्हणजे बहुतेक मराठीत युनिवर्सल) म्हणतात ते सत्य लिहिलयस... जबरी ..
Post a Comment