Saturday, May 28, 2011

पुढच्या वेळेस बघु...


दरवर्षीप्रमाणे यावेळेस सुद्धा बढती मिळालेल्यांची यादी झळकली, त्यात खुप काम करुन सुद्धा नाव न आल्याने सगळ्यांनीच कंपनीच्या मॅनेजमेंटच्या असलेल्या आणि नसलेल्या अकले बद्दल शंका उपस्थित केल्या. आमचे काही मित्र एवढे frustrate झाले होते की प्रमोशन लिस्ट आल्यावर एक मेसेज सगळीकडे फिरायला लागला होता, "वर्षभर काम केले XX घासुन आणि शेवटी मिळाले काय XXX आणि लसुण!! अर्थातच थोड्या फार फरकाने हा मेसेज Appraisal season मध्ये सगळ्याच कंपन्यांमध्ये फिरत असतो, कारण माझ्या दुसर्‍या कंपनीतल्या मित्राने हाच मेसेज मला त्याच्या अप्रेजलच्या वेळेसही आल्याचे सांगितले होते, म्हणजे काय सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

लिस्ट येण्याच्या आधी माझ्या मॅनेजरने मला गप्पांच्या ओघात सांगितले होते की त्याने प्रमोशन न मिळाल्याने त्याची आधीची कंपनी सोडुन नविन कंपनी join केली आणि तो त्याच्या जीवनातला सगळ्यात चुकीचा decision होता, आणि मग ६ महिन्यातच त्याच्या बरोबरच्यांचे कसे जुन्या कंपनीत प्रमोशन झाले आणि त्याचे दुसर्‍या कंपनीत कसे हाल झाले, आणि शेवटी सांगायचा मुद्दा असा की, प्रमोशन न मिळाल्याने हताश नाही व्हायचे, आज नाही तर उद्या ते मिळणारच आहे. हे त्याचे एवढे फंडे प्रमोशन लिस्ट येण्याच्या २ दिवस आधी ऎकल्याने माझी खात्रीच झाली होती की बॉस यावेळेस आपला पत्ता कट आहे.

काहीवेळेस स्वत:ला प्रमोशन न मिळाल्यापेक्षा त्या चुX ला कसे मिळाले याचे दु:ख जास्त असते, त्यामुळे लिस्ट आल्यावर आपल्याला प्रमोशन का मिळाले नसेल याचा विचार करण्यापेक्षा  त्याला किंवा तीला प्रमोशन कस काय मिळु शकते हाच वादाचा विषय असतो, आणि या नंतरचा मुद्दा असतो तो म्हणजे पेपर टाकणे.

प्रमोशन न मिळाल्याने किंवा अपेक्षित पगार वाढ न मिळाल्याने असंतुष्ट पब्लिक फार मोठे दावे सादर करतात, की "बास! हे चणे फुटाणे घेऊन मी काही काम करणार नाहीये, अरे त्या xyz  कंपनीत २०% पगारवाढ मिळाली आणि मग आम्हीच का या १०% वाढीवर राहायचे, ते काही नाही आपला मित्र आहे तिकडे उद्याच resume अपडेट करतो आणि तिकडे स्विच मारतो, आणि मग तिकडच्या कंपनीतली सद्य परिस्थिती सांगण्यासाठी त्याच मित्राचा फोन येतो आणि स्विच मारायचा विचार बारगळतो, पण मग नविन गोष्ट, बॉस काल शेवटचा दिवस होता लेट सिटिंगचा याच्यापुढे लेट सिटिंग बंद, सहा वाजता दुकान बंद करुन घरी, शनिवार रविवारी काम बंद, बास खुप झाले, "इतने पैसे मे इतनाहीच मिलेगा". नविन सांगणे नको की अस काही होत नाही आणि सगळेच उशिरा पर्यंत बसतात आणि शनिवार रविवार काम करतात.

कंपन्या हुशार असतात, परफॉर्मन्स बोनस नावाचे गाजर दाखवुन ते appraisal नंतरचा एक महिना अजुन ताणतात कारण अमुक अमुक दिवसापर्यंत जर तुम्ही नोकरीवर असाल तरच तुम्हाला मागच्या वर्षीचा परफॉर्मन्स पे मिळेल आणि त्यातही जर तुम्ही पेपर टाकले तर तो सुद्धा मिळणार नाही, म्हणजे एक महिना अजुन गेला. आणि त्याच्या नंतर जर पेपर टाकले तर २ महिन्याचा नोटिस पिरिअड, म्हणजे ३-४ महिने यातच गेले पण अजुन २ महिने थांबलो तर पुन्हा मिड-टर्म प्रमोशनची लिस्ट येणार मग २ महिन्यासाठी कशाला कंपनी सोडा, बॉस तर बोलला होता ना मागच्या वेळेस की मिड-टर्मला प्रमोट करतो मग थांबुया ना, बघु झाले प्रमोशन तर चांगलेच आहे. अशा वेळेस प्रमोशन झाले तर चांगले नाही तर पुन्हा बोंब, कारण मिड-टर्म अप्रेजल मिड-टर्मला न येता थोडे उशिरानेच येते मग अजुन तो २ महिन्याचा नोटिस पिरिअड and so on the cycle continues..

आणि मग नाराज होऊन आपण बॉस बरोबर मिटिंग घेतल्यावर साक्षात्कार होतो की आपण कंपनीत खुप महत्त्वाचे आहोत आणि याच कंपनीत आपली खरी ग्रोथ होणार आहे, पुढे भरपुर पगारवाढ आहे आणि पुढचे प्रमोशन लवकर लवकर होणार आहेत हे सगळे ऎकुन आपण एका नव्या जोशाने बॉसच्या केबिन मधुन बाहेर पडतो आणि नंतर काही दिवसांनी कानावर येते की या मिटिंगच्या वेळेस आपला बॉसच नोटिस पिरिअड वर होता.

2 comments:

Blogman said...

Well said. same story everywhere. :)

Mahendra Kulkarni said...

एक्झॅक्टली असंच होत असतं. :)