वरंधा घाट बनवण्यासाठी इंग्रजांनी कावळ्या गडाला दोन भागात कापला अस ऎकुन आहे. तस बघायला गेल तर कावळ्यावर अक्षरश: काहीच नाहीये, हो पण काही दुर्गप्रेमींनी भगवा मात्र तिथे फडकवला आहे. कावळ्यावरुन संपुर्ण वरंधा घाटाचा खुप मस्त view मिळतो जो बघितल्यावर अशक्य भारी वाटते. वरंधा घाट ओलांडला की लगेचच खाली समर्थांची शिवथर घळ आहे त्यामुळे कावळ्याला गेल्यावर शिवथर घळीला जाणे भागच आहे.
कसे जाणार
कावळ्या गड वरंधा घाटातच आहे, त्यामुळॆ पुण्याहुन भोर मार्गे वरंधा घाटाने जावे, भोरला पोहोचल्यावर महाड कडे जाणार्या रस्त्याने सरळ गेल्यावर आपण वरंधा घाटातच पोहोचतो, तिथे पोहोचल्यावर आपल्याला घाटात एका ठिकाणी बरेच वडापाव, भजी विकणारे दिसतात, तो वरंधा घाटातला पावसाळ्यातला एक मस्त स्पॉट आहे, त्या स्पॉटपासुन थोडेच पुढे गेले की घाट डावीकडे वळतो, तिथे डावीकडे न वळता सरळ अगदी थोडेच पुढे गेलो तर पाच-सहा पायर्या दिसतात, आणि त्यापुढे लागणारी पायवाट सरळ गडावर घेऊन जाते.
नंतर घाटाने सरळ खाली उतरले तर ५-६ किमी नंतर उजवीकडे शिवथर घळीकडे जाणारा रस्ता जातो, त्या रस्त्याने ६ किमीवर शिवथर घळ आहे, शिवथर घळ खुप मस्त आहे, तिथला परिसर बघुन खरच थक्क करायला होते, आमच्या एका मित्राची तर तिथे समाधीच लागली होती. पावसाळ्यात तर तिथला परिसर खुप भारी असणार यात वादच नाही.
शिवथर घळीत जेवणाची सोय होऊ शकते.
अंदाजे खर्च
आम्ही माझी मारुती घेऊन गेलो होतो. चांदणी चौकापासुन जाऊन येऊन जवळपास २४० किमी होतात. त्यामुळे १५ लिटर पेट्रोल लागले, जर सकाळी लवकर निघालो तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत घरी येऊ शकतो, मध्ये खेड शिवापुरचा टोल नाका लागतो त्याचा टोल (अंदाजे १५०) आणि नाश्ता-जेवणाचा खर्च होइल तेवढा.















0 comments:
Post a Comment