वर्ल्डकप नंतर आता पहिल्यांदी क्रिकेट बघण्याची इच्छा झालीये, मध्ये झालेल्या थिल्लर IPL नंतर आणि त्या नंतरच्या झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यामध्ये पण मॅच बघण्याची इच्छा झाली नाही. अर्धा उत्साह त्या वेस्ट इंडिजमधल्या भिकार खेळपट्ट्या, बेकार प्रक्षेपण आणि अडनिड वेळ बघुनच उडतो आणि उरलेला उत्साह वेस्ट इंडिजची फालतु टीम बघुन उडतो. पण आता मात्र सीन वेगळा आहे, its time for India tour of England!
वेस्ट इंडिजमध्ये अपेक्षेप्रमाणे जिंकलो पण शेवटी ते वेस्ट इंडिज होते आणि हे इंग्लंड आहे, पण आपली पण फुल स्ट्रेंग्थ टीम आता आलीये, सचिन, सेहवाग, गंभीर, युवराज, झहिर सगळे परत आले आहेत त्यामुळे आपल्याला खुप भारी टेस्ट क्रिकेट बघायला मिळणार यात वाद नाही. इंग्लंडचा सध्याचा फॉर्म बघता, हा दौरा वेस्ट इंडिज सारखा असण्याची शक्यता सुतराम नाहीये. सध्याच श्रीलंकेला हारवुन इंग्लंडने आपल्याला एक इशारा तर दिलाच आहे. आणि इंग्लंडचे फास्ट बॉलर्स ब्रोड, अॅंडरसन, ब्रेस्नन आणि ट्रेम्लेट जबरी फॉर्म मध्ये आहेत आणि इंग्लंडचा ट्रम्प कार्ड म्हणजे ऑफ स्पिनर ग्रॅम स्वान, सद्य परिस्थितीत स्वान नंबर एकचा स्पिनर आहे आणि भारतीय लोक स्पिनला कितीही चांगले खेळत असले तरी पण स्वानची बॉलिंग खेळुन काढणे तितकेसे सोपे नसणारे कारण तो निगेटिव बॉलिंग करणारा अॅशले जाइल्स नाहीये आणि श्रीलंकेच्या स्पिन चांगल्या खेळणार्या बॅट्समनला सुद्धा त्याने बरच सतावलय.
इंग्लंडचे बॅट्समन खुप भारी फॉर्ममध्ये नसले तरी ते जर एकदा फॉर्मात आले तर मात्र काही खर नाही. अॅंड्रु स्ट्रॉस, अलिस्टर कुक इयन बेल, पिटरसन, आणि माझ्या आवडता जोनाथन ट्रॉट ह्या मधले ३ लोक जरी फॉर्मात आले तर आपल्यासाठी गेम ओवर असणार. कारण इशांत आणि प्रविण कुमार वेस्ट इंडिजच्या सुमार फलंदाजांसमोर जेवढे प्रभावी ठरले होते, तेवढेच ते या लोकांसमोर निष्प्रभ ठरु शकतात त्यामुळॆ झहिर आणि हरभजनवरच आपली भिस्त असणार यात शंका नको. श्रीसंतपेक्षा मुनाफ पटेलला खेळवले तर कदाचित थोडाबहुत फरक पडु शकतो. हरभजनने ४०० विकेट्स घेतल्या तरी त्याचा आत्ताचा फॉर्म फार भारी नाहीये, त्याला विकेट्सच मिळत नाहीयेत त्यामुळे ४०० विकेट्स घेतल्या तरी त्याला All time great bowlers च्या लिस्ट मध्ये स्थान मिळवायचे असेल तर हा दौरा त्याच्या साठी खुप महत्वाचा ठरणार आहे. अनिल कुंबळेला सुद्धा लोक २००२-०३ च्या इंग्लंड दौर्यानंतर जगातला एक महान गोलंदाज म्हणुन ओळखु लागले, (त्या आधी तो फक्त भारतातच ग्रेट होता).
२००७ चा इंग्लंड दौरा अनेक गोष्टींसाठी गाजला होता त्यात सगळ्यांना एक new and improved झहिर खान बघायला मिळाला, झहिरची इंग्लंडच्या टीमशी झालेली खुन्नस हा त्या दौर्यातला खास क्षण होता आणि झहिरने नंतर इंग्लंडच्या टीमची जशी वाट लावली होती ते बघुन खुप मजा आली होती. खरतर त्या दौर्यात अनेक प्रॉमिसिंग चेहरे दिसले होते, दिनेश कार्तिक आणि आर पी सिंग ते सध्या गायबच दिसतात, खरतर RP सिंगने त्या दौर्यात जबरा बॉलिंग केली होती. त्याने लेफ्ट आर्म राऊंड दि विकेट बॉलिंग करुन मायकल वॉनचा जो दांडका काढला होता तो बॉल अजुनही लक्षात आहे. त्या दौर्यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, संपुर्ण दौर्यात भारता तर्फे एकच सेंच्युरी नोंदवली गेली होती आणि ती सुद्धा अनिल कुंबळे कडुन!!
इंग्लंडला मात्र हा दौरा तितकाच कठिण असणारे, कारण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण, आता यांच्याबद्दल खरच काही आणखी लिहिण्याची गरज आहे का?? सेहवाग (किंवा मुकंद) आणि गंभिरने चांगली सलामी दिली की येणारे पुढचे ३ फलंदाज इंग्लंडची वाट लावायला पुरेसे आहेत, सचिन आणि द्रविडची कदाचित लॉर्ड्स वरची शेवटची टेस्ट, द्रविडने तर इथेच डेब्यु सुद्धा केला होता आणि सचिनला सेंच्युरी नंबर १०० करायला फक्त १ चीच कमी आहे त्यामुळे आपल्याला नक्की काही तरी स्पेशल बघायला मिळणार यात शंका नाही.
या दौर्याबद्दल आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे डेविड लॉईडची कॉमेंट्री, डेविड लॉईड सध्याच्या काळातला सगळ्यात सही कॉमेंटेटर आहे त्यामुळे त्याची कॉमेंट्री ऎकायला मिळणार हा सुद्धा या दौर्याचा प्लस पॉइंटच म्हणावा लागेल.
असो २१ पासुन पहिली टेस्ट सुरु होतेय आणि धोनीची टीम ही सिरिज जिंकुन नंबर १ चा टॅग पुढे सुद्धा मिरवेल अशी आशा करायला काही हरकत नाही.










0 comments:
Post a Comment