किंडल घेतल्यापासुन माझा वाचन करण्याचा interest वाढतच चालला आहे, गेल्या वर्षभरात मी एकही पुस्तक पुर्ण वाचले नव्हते आणि kindle आणल्यापासुन २ महिन्यातच मी ७ पुस्तके वाचली. kindle वर पुस्तक वाचण्याचा अनुभव निराळाच आहे. (भारतात किंडल home shop18 कडुन order करता येते आणि त्याची किंमत ७,९९९ एवढी आहे या वरती रुपये १५३ octroi भरावा लागतो आणि delivery १५ दिवसामध्ये होते.)

अशातच बर्याच दिवसांपासुन वाचु म्हणतो पण कधी वेळच आली नाही अस अॅगाथा ख्रिस्तीचे and then there were none नावाचे एक अप्रतिम नॉवेल वाचण्यात आले, १९३९ सालात लिहिले असले तरी ते वाचण्यात कधीही बोअर होत नाही. त्यातली गोष्ट अशी आहे की १० लोक ज्यांनी एक खुन केला असतो आणि तरी ते पकडले गेलेले नसतात आणि त्यामुळे त्यांना कोणतीच शिक्षा झाली नसते अशा लोकांना एका बेटावरच्या बंगल्यावर वेगवेगळी आमिष दाखवुन बोलवले जाते. आणि वेगवेगळे सांगायला नको की एक एक करुन त्यांच्यापैकी प्रत्येकाचा खुन व्हायला लागतो आणि बाकीच्यांना कोण खुन करतय याची काहीही कल्पना नसते. त्या बंगल्यातल्या प्रत्येक खोलीत एक कविता लावली असते ten little soldiers नावाची ती अशी -
Ten little Soldier boys went out to dine;
One choked his little self and then there were nine.
Nine little Soldier boys sat up very late;
One overslept himself and then there were eight.
Eight little Soldier boys traveling in Devon;
One said he'd stay there and then there were seven.
Seven little Soldier boys chopping up sticks;
One chopped himself in halves and then there were six.
Six little Soldier boys playing with a hive;
A bumblebee stung one and then there were five.
Five little Soldier boys going in for law;
One got in Chancery and then there were four.
Four little Soldier boys going out to sea;
A red herring swallowed one and then there were three.
Three little Soldier boys walking in the zoo;
A big bear hugged one and then there were two.
Two Little Soldier boys sitting in the sun;
One got frizzled up and then there was one.
One little Soldier boy left all alone;
He went out and hanged himself and then there were none.
कविता नीट वाचली तर अस लक्षात येते की १० लोक असतात आणि त्यातला एक एक जण कसा मरत जातो त्याचे वर्णन केले आहे आणि कथेत सुद्धा असच घडत जात, अजुन एक गोष्ट अशी की त्या घरात १० कप ठेवले असतात ज्याच्यावर चित्र रेखाटली असतात आणि जेव्हा एक एक जण मरत जातो तेव्हा एक एक कप गायब होत जातो. so शेवटी काय होते, खुनी कोण आहे घरातला की बाहेरचा कोणी? कोणी वाचते का? असे अनेक प्रश्न येतात पण suspense novels ची खरी गंमत तर शेवटामध्येच असते आणि कथेचा शेवट बिलकुल निराश करत नाही. पुस्तक वाचल्यावर आपण फक्त म्हणु शकतो की Agatha Christi rocks!











3 comments:
मस्त लेख गौरव! एका छान पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी आहे. आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल कुणाशीतरी बोलतो तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन चालू होतं.
Thanks Aditya..
Post a Comment