आज आहे शिक्षक दिन, बाकी आपले सगळ्यात पहिले गुरु तर आपले आई बाप भाऊ बहिण आणि इतर कुटुंबिय असतात यात तर वादच नाही नंतर येतात ते आपले शाळेतले शिक्षक, आज अनेकांनी (at least माझ्या फ़ेसबुक मधल्या मित्रांनी) Teacher's day म्हणुन टीचर्स नावाच्या स्कॉचची बाटलीचा फोटो शेअर करुन आपल्या गरिब मेंटॅलिटीचा परिचय करुन दिला, त्यांना अस वाटत होते की आपण फार cool काम केलेय.
असो, माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर well खर सांगायचे तर अस खुप लाइफ मध्ये चेंज करणारा शिक्षक मला तर भेटला नाही, ,शाळेत किंवा कॉलेज क्लास मधला असा कोणी शिक्षक मला आठवत नाही की ज्याने माझे आयुष्यच बदलुन टाकले आहे हां पण आवडते शिक्षक बरेच आहेत, ज्यांचे शिकवण मला फार आवडत आणि main म्हणजे अजुनही आठवत. आता depend करत की शिक्षकाची definition काय आहे ते मला वाटत की जो कोणी आपल्याला काही तरी शिकवतो तो आपला शिक्षक.
ही definition जर लावली तर मग शिक्षकांची लाईन खुप मोठी होईल, त्यात आई वडिल आणि शाळा कॉलेजातल्या मास्तर पासुन ते आपले परम मित्र आणि आपला ऑफिस मधला बॉस सुद्धा येऊन जाईल. मित्र तर आपले खरे शिक्षक असतात, मास्तरांनी वर्गात काय शिकवल ते समजवुन सांगण्यापासुन दिलेल्या पहिल्या शिवी पर्यंत आणि त्या चित्रांच्या पुस्तकांपासुन तसल्या पिक्चर पर्यंत सबकुछ तर मित्रच शिकवत असतात, शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांपेक्षा मित्रांकडुनच जास्त शिकायला मिळते, कार-बाईकच्या वेगवेगळ्या प्रकारांपासुन ते बीअर च्या वेगवेगळ्या ब्रॅंडपर्यंत आणि हॉटेलमध्ये काटा चमच्याने कस खातात हे शिकवण्यापासुन सिडनी शेल्डन हे बाईचे नसुन माणसाचे नाव आहे हे सांगण्यापर्यंत मित्रच खरा गुरु असतो. (लग्न झाल्यावर बायकोसुद्धा गुरु होते अस माझा एक मॅरिड मित्र म्हणतो).
ऑफिसमधला बॉस हा पण एक गुरु असतो, माझ्या पहिल्या ऑफिसमधला बॉस तर खरच माझा गुरु आहे, ऑफिसमध्ये काम कसे करायचे त्यापासुन लोकांशी कस (professionally) वागाव ते हॉटेल मध्ये टीप किती ठेवावी या पर्यंत त्याने शिकवले, (पण माझ्या सध्याच्या बॉसला मी गुरु वगैरे मानत नाही त्रास आहे तो). बॉस बरोबरच आपले सिनिअर कलिग्ससुद्धा थोडे फार गुरुच असतात आपले त्यामुळे अस करत गेलो तर ही लिस्ट श्री दत्तगुरुंच्या २४ गुरुंपेक्षा खुपच मोठी होऊन जाईल.
पण शिक्षक दिन म्हंटला की आठवतात ते शाळा आणि कॉलेजमधले शिक्षक, आणि बरेचदा आमच्या शाळेत शिक्षक दिनाला विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याचा चान्स मिळायचा आणि त्या दिवशी जे मुल शिक्षक बनायचे ते हमखास कोणाला ना कोणा पोराला धरुन त्यांना ते ज्या शिक्षकाचा रोल करायचे त्यांच्या स्टाईलने मारायचे.
मला आठवतात ते माझ्या कॉलेजमधले ११ वी चे अकॉंट्सचे नाडगौडा सर, त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर महान होता, त्यांच्या एका लेक्चरला जेमतेम ३ मुले होते आणि थोड्यावेळाने (खरोखरच) एक काळे कुत्रे येऊन बसले तेव्हा ते म्हणाले आता कोणीच म्हणु शकणार नाही की नाडगौडा सरांच्या लेक्चरला काळ कुत्रसुद्धा नव्हत! अजुन एक होत्या त्या म्हणजे अकॉंट्सच्याच अमृता मॅडम, मुली जर वर्गात लक्ष देत नसल्यातर त्या म्हणायच्या मुलींनो लक्ष द्या नाहीतर आयुष्यभर DBM (धुण भांडी मुले) करावे लागेल.
आता पर्यंत अनेक शिक्षक भेटले आणि अजुन सुद्धा भेटतील, पुस्तक वाचुन आणि e-learning करुन सगळ कळण्याची सोय अजुन तरी झाली नाहीये त्यामुळॆ शिक्षक अजुनसुद्धा फॅशनमध्ये आहेत आणि पुढेही राहतील.










0 comments:
Post a Comment