वयाच्या २५ व्या वर्षी आयुष्यात ज्या काही अडचणी येतात त्याला Quarter life crisis अस म्हणतात ही आमच्या मित्रांनी केलेली definition, कारण सध्या सगळेच त्याच्यातुन जात आहेत, एवढ confusion कधीच नव्हते, नोकरी वगैरे सगळ व्यवस्थित चालु आहे अस बाहेरुन दिसत असल तरी पण आत मध्ये काय गोंधळ चालु असतो तो ज्याचा त्यालाच माहित. वयाच्या १८-१९ व्या वर्षी ज्या काही गोष्टी imagine केल्या होत्या त्या imagination मध्येच राहिल्या, डिग्री मिळण्याच्या आधी बॉस एकदा डिग्री मिळुदे मग हे करु ते करु खुप भारी काम करु आणि एकदा डिग्री मिळुन नोकरी मिळाली की मात्र पाट्या टाकण्याशिवाय फार काही वेगळे करतो अस मात्र वाटत नाही.
एक वेळ अस वाटत की आपण सगळ काही करु शकतो, नोकरी सोडुन द्यावी आणि सरळ आपल काही तरी सुरु कराव पण नंतर विचार येतो की आपला skill set काय स्वत:च काय सुरु करणार, कोण येईल आपल्याकडे, उगाच धंदा बुडाला तर काय करायचे, त्यापेक्षा जे आहे ते चालु देऊ किंवा सरळ स्विच मारु पण स्विच मारुन दुसरीकडे सुद्धा काय परिस्थिती असते ते चांगले माहित असते त्यामुळे अनोळखी मित्रापेक्षा ओळखीचा शत्रु बरा अस म्ह्णुन जे आहे ते चालु द्यायचे पण जे आहे ते चालु दिले की पुन्हा frustration येते आणि पुन्हा तेच विचार. अशा बर्याच गोष्टी असतात की माहिती असत की ही गोष्ट केली किंवा केली नाही तरी काही फरक पडत नाही पण हिंमतच होत नाही. एक विचित्र प्रकारची भिती किंवा negative filling असते खर सांगायच तर fail होण्याची भिती असते हे नाही झाल तर काय होईल? कोण काय म्हणेल?
बरेचदा अस वाटत की आपण जे काही करतो आहे ते स्वत:साठी की दुसर्याला आपल्याबद्दल कस वाटाव या साठी हेच कळत नाही, काही वेळेस एखादी संधी येते, पण तिथे पगार सध्या जेवढा मिळतो त्यापेक्षा बराच कमी पण काम खुप चांगले असते पण लगेच दुसरा विचार येतो, यार इथे गेलो तर आपण मागे तर नाही पडणार ना.. आपले सगळे मित्र पुढे निघुन जातील, आपल्याला वेड्यात काढतील आणि आता महिन्याला एक xyz पगार बॅंकेत जमा होत असतो त्याची सवय झाली असते खर्च गरजा तश्या वाढल्या असतात त्यामुळे ते सगळ सोडुन पुन्हा मागे जावे का? असा प्रश्न सारखा पडत असतो.
त्यातल्या त्यात लग्न झाले नाहीये त्यामुळे ती एक जमेची बाब म्हणता येइल, पण लग्न झाले नसले तरी यार एखादी gf मिळाली तर काही हरकत नसते पण आजुबाजुला असलेल्या मुली सगळ्या विवाहेच्छुक catagory च्या असतात त्यामुळे तिकडे पुढे जावे म्हंटले तर वर म्हंटल्याप्रमाणे जसे आहे तसेच चालु द्यावे लागेल कारण तिकडे "well settled" असा एक criteria असतो आणि मग खरच कोणीतरी अस भेटत की ज्याला बघुन अस वाटते की यार होऊया सेटल काय फरक पडतोय, पण कुठे तरी काही तरी माशी शिंकते आणि गाडी जिथे होती तिथेच थांबते, पण आपण एकटेच नसतो कारण आपल्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा असच काहीस घडत असत. मला एक email आला होता मध्ये being 20 something त्यातला एक para इथे टाकतो जो ही सगळी सिच्युएशन perfectly explain करतो,
You get your heart broken and wonder how someone you loved could do such damage to you. Or you lie in bed and wonder why you can't meet anyone decent enough that you want to get to know better. Or maybe you love someone but love someone else too and cannot figure out why you're doing this because you know that you aren't a bad person. One night stands and random hook ups start to look cheap. Getting wasted and acting like an idiot starts to look pathetic. You go through the same emotions and questions over and over, and talk with your friends about the same topics because you cannot seem to make a decision. You worry about loans, money, the future and making a life for yourself... and while winning the race would be great, right now you'd just like to be a contender!










0 comments:
Post a Comment