सध्या वाचण्यात आलेले आणखी एक मस्त पुस्तक म्हणजे सिडनी शेल्डनचे मास्टर ऑफ द गेम. हे नॉवेल म्हणजे ६ पिढ्यांची गोष्टच आहे. गोष्ट सुरु होते ती जेम्स मॅकग्रेगोर पासुन, जो हिर्यांच्या शोधात स्कॉटलंडहुन आफ्रिकेत जातो. तिथे त्याला हिरे सापडतात पण त्याचा पार्टनर (सोलोमन) त्याला धोका देतो आणि जेम्स पुन्हा पहिल्यापासुन सुरुवात करतो आणि खुप हिंमत करुन बांदा नावाच्या त्याच्या साथिदाराबरोबर पुन्हा हिरे शोधुन श्रीमंत होतो आणि सोलोमनचा बदला घेतो. इथे एक interesting गोष्ट अशी, की जेव्हा जेमी आणि बांदा हिरे शोधायला (चोरायला) जातात तेव्हा तिथे दोन चौकिदार त्यांच्या मागावर असतात त्यांची नाव क्रुगर आणि ब्रेंट अशी असतात पण जेम्सच्या सुदैवाने तो त्यांच्यापासुन वाचतो आणि नंतर तो त्याच्या कंपनीला क्रुगर अॅंड ब्रेंट्स असेच नाव देतो.
त्यानंतर जेम्स आणि सोलोमनच्या मुली (मार्गारेट) मधल्या संबंधातुन, त्यांना मुलगा होतो आणि मग जेम्सचे मार्गारेटशी लग्न होते लग्नानंतर त्यांना मुलगी होते केट तिचे नाव आणि ही केटच मास्टर ऑफ द गेमची खरी नायिका / खलनायिका आहे. केटचा हट्टीपणा आणि आपल्याला हवे तेच करायचे आणि ते करताना तिने थंड डॊक्याने घेतलेले निर्णय, कोणत्याही गोष्टीत कधीच हार मानायची नाही आणि काहीही करुन आपल्याला हवे ते मिळवायचेच असा तिचा स्वभाव. त्यामुळे ती तिच्या जवळच्या लोकांची आयुष्यच बदलुन टाकते, तिच्या दृष्टीने तिने जे केले सर्वांच्या हितासाठीच पण त्यात तिचा स्वार्थीपणा लपुन राहात नाही.
पुस्तकाच्या सुरुवातच केटच्या ९० व्या वाढदिवसापासुन होते ज्यात केटचा मुलगा, मुलाच्या जुळ्यामुली, आणि नंतर त्या दोन मुलींना होणारी मुले एवढ्या लोकांचा सहभाग असतो आणि नंतर केटला तिच्या आयुष्यातला सगळ्या घटनांबद्दल आठवत आणि फ्लॅशबॅकमध्ये बाकी सगळी गोष्ट. माणसाचा स्वभाव कसा बदलतो आणि स्वत:च्या स्वार्थासाठी (हट्टासाठी) माणुस काय काय करु शकतो याचे ultimate वर्णन पुस्तकात आहे. एवढ्या ५-६ पिढ्यांच्या सगळ्या गोष्टी असुनसुद्धा पुस्तक वाचायला कधीच बोअर होत नाही, एकदा वाचायला घेतले तर ते कधी संपवतो अस मला झाले होते.
अजुन जर हे पुस्तक वाचले नसेल तर नक्की वाचा खुप मस्त पुस्तक आहे. याच्यावर अजुन पिक्चर कसा काढला नाही याचेच आश्चर्य वाटते.











1 comments:
I loved the book review.
Sidney Sheldon's The Naked Face, Are u afraid of the dark & the stars shine down are also worth reading.
Blogvarche bakiche post pan aavadle...
- http://bloggervasant.blogspot.com/
Post a Comment