अनेक दिवसांपासुन प्लॅन केलेला नाणेघाट शेवटी कसाबसा मागच्या आठवड्यात झाला. अनेक ब्लॉगवर वगैरे वाचुन रस्ता वगैरे लिहुन घेतला आणि निघालो. पुण्याहुन तस काही फार जवळ नाहीये, पण एका दिवसात होऊ शकते. (एक चांगला ड्रायवर बरोबर असला की झाले).
कस जाणार?
तस पुण्याहुन नाणेघाटात कस जायचे अस सांगणारे ब्लॉग बरेच कमी आहेत बर्यापैकी ब्लॉगर्सने मुंबईहुन जाण्याचा रस्ता व्यवस्थित सांगितला आहे. पुण्याहुन जाताना नाशिक रोड गाठावा, त्या रस्त्यावरुन सरळ नारायणगावापर्यंत जायचे (नाशिक रोड बेकार आहे), नाराय़णगावातुन डावीकडे जुन्नरकडे जायचा रस्ता आहे (हा रस्ता एक नंबर आहे). जुन्नरमध्ये शिरुन सरळ जात राहावे, तिथे शिवाजी पुतळ्यापाशी आल्यावर तिथे नाणेघाटात जायचा रस्ता सरळ आहे अस दाखवले आहे, तिथे चुकुनही जाऊ नये तो रस्ता प्रचंड खराब आहे, खर तर तो रस्ताच नाहीये, जेमतेम २० किमी अंतर आहे ते, पण जायला किमान १ १/२तास लागतो, त्यामुळे त्या रस्त्याने जाऊ नये ही नम्र विनंती. त्याऎवजी तिथुन उजवीकडे वळावे थोडे पुढे गेलो की डावीकडे नाणेघाटाला जायचा अजुन एक रस्ता आहे तिथुन नाणेघाट जवळपास ३५ किमी आहे पण रस्ता ठिकठाक आहे.
आता दुसरी गोष्ट, या रस्त्याने गेलो की आपण डायरेक्ट नाणेघाटाच्या वरती पोहोचतो, ट्रेकचा काहीच संबंध नाही. जर ट्रेक करायचा असेल तर दुसरा रस्ता आहे. जो माळशेजघाटाच्या इथुन जातो.
नाणेघाटाच्या जवळ खायला प्यायला तस काहीच नाहीये, एक छोटेसे हॉटेल वजा घर दिसले होते तसे घाटाच्या अलीकडे पण आम्ही काही गेलो नाही तिकडे. जुन्नरहुनच काही घेतले तर चांगलेच.
![]() |
| Naneghat |
![]() |
| Jeevdhan as viewed from Naneghat |
![]() |
| View Naneghat |













5 comments:
छान वर्णन व फोटो. मी जून महिन्यात नाणेघाटला गेलो होतो. तेंव्हा त्यावर लिहिलेल्या लेखमालिकेचा हा URL आहे. जमले तर जरूर वाचा.
http://chandrashekhara.wordpress.com/
मस्त रे... सिंम्पल पण उपयुक्त माहिती.
@Nagesh - धन्यवाद.
@ Chandrashekhar kaka - अप्रतिम पोस्ट
Post a Comment