Monday, December 12, 2011

लुटालुट


कालच पुण्याच्या फिनिक्स मॉल मध्ये गेलो होतो, बराच मोठा मॉल आहे, त्यामुळे फिरुन फिरुन भुक लागली, तसच वरच्या फुड कोर्ट मध्ये गेलो, तिकडे सगळीकडे लिहिले होते, की मिनरल वॉटर हे MRP लाच मिळेल, म्हंटले वा, थोडे तरी सुधारले हे मॉलवाले, नाहीतर होतेच १५ ची बाटली ३० ला. एका ठिकाणुन घेतली बाटली, त्याने बिल दिले ३० रुपये, मी त्याला म्हंटले बॉस MRP लाच देणार आहेस ना बाटली मग एक लिटरचे ३० कसे झाले, तो म्हणाला साहेब MRP  ३० रुपयेच आहे, मी ती बाटली बघितली त्याच्यावर चक्क ३० रुपयेच MRP होती, हादरलोच, कारण मागच्याच आठवड्यात मी किनलेचीच बाटली १६ रुपयाला घेतली होती, त्याच्यावर MRP सुद्धा १६ च होती. MRP वरच तो माणुस विकत होता, त्यामुळे वाद घालण्यात पॉइंट नव्हता, पैसे दिले आणि निघालो.

आता असा सीन आहे की जे पब्लिक मॉल मध्ये येते, ते देऊच शकतात एवढे पैसे, म्हणुन त्यांच्याकडुन सरळसोट ३० रुपये घेतात पण एखादा माणुस त्या बाटलीसाठी ३० रुपये देऊ शकतो म्हणुन ते त्याच्याकडुन घ्यायचे का? दुसरा प्रश्न असा आहे, की त्या ३० रुपयाच्या बदल्यात मला अधिक चांगल्याप्रकारचे पाणी मिळतेय का? जेव्हा मी एखाद्या गोष्टीसाठी जास्त पैसे मोजतोय, तेव्हा माझा काहीतरी फायदा झालाच पाहिजे ना? आणि आता या लोकांनी सरळसोट पळवाट काढली आहे, MRP च ३० लावल्यावर कोणी तक्रारसुद्धा नाही करु शकत ना की बॉस तुम्ही MRP पेक्षा जास्त किंमत लावता आहेत.

एखादी गोष्ट जेव्हा MRP वर विकली जाते तेव्हा त्याच्या वर आकारले जाणारे कर वगैरे हे सगळे त्या MRP वरुन ठरतात, त्यामुळे सरकारला काही प्रॉब्लेम नाही, त्यांना त्यांचा tax व्यवस्थित मिळतो आहे, पाणी विकणार्‍या कंपनीला काही नुकसान नाही, आणि मॉल मधल्या लोकांना तर फायदा पक्का. याच्यावर उपाय एकच आपण आपल्या घरुन पाण्याची बाटली घेऊन जायची, आपल्याला प्रॉब्लेम आहे ना, बाकीचे तर स्वखुशीने तेवढे पैसे देता आहेत ना, मग सोडुन द्यायचे. जो जास्त पैसे देऊ शकतो, त्याच्याकडुन जास्त पैसे घ्यायचे ही आपल्या देशात पद्धतच आहे, कोणत्याही पर्यटन स्थळाला गेलो तर विदेशी नागरिकांसाठी दसपट आकारणी होते, त्यामुळे ही अशी गोष्ट आपल्याच देशात घडु शकते, infact माझ्या एका मित्राने मला सांगितले होते, की मुंबईतल्या एका मल्टिप्लेक्समध्ये त्याला एका ज्युससाठी ६० रुपये मोजावे लागले (MRP Rs. 60) आणि बाहेर त्याची MRP Rs.25 वगैरे होती.

या गोष्टीची तक्रार करुन काही फायदा नाहीये, कारण हे असे प्रकार आहेत हे सगळ्यांना माहित आहे, ही पोस्ट लिहिण्याचा एकमेव उद्देश असा की यापुढे कोणत्याही मॉलला जाण्याआधी घरुन पाण्याची बाटली घेऊन जाणे. बाकी हे असे प्रकार आता वाढतच जाणार आहेत.

बळच किडा म्हणुन मी त्या बाटल्यांचे फोटोसुद्धा काढले आहेत.



5 comments:

Sagar Kokne said...

मॉल मध्ये जायचे तर ते श्रीमंतांनीच...आपण मध्यम वर्गीय खिशात पैसे असले तरी ही महागडी जीवनपद्धती आपल्याला रुचतच नाही रे..

Gaurav said...

you are right man..

Think-with-NIL said...

whether they take a separate stock of that bottles which have Rs.30 price tag ?
because we can get the same brand and same quantity outside with Rs. 15/16 price tag, then how come they get bottles with that price tag ?

Digamber said...

it is special packing for speciific malls, they provide special price tag for those malls.

Gaurav said...

@ Nil - As Digambar said, its a special packing for those malls..