Monday, December 5, 2011

Cricket.. क्रिकेट (पोस्ट नंबर १०१)


च्याआयला कोण म्हणाले टेस्ट आणि वन डे क्रिकेट संपले, २०-२० म्हणजे क्रिकेट, आता पुढे कोणीच टेस्ट खेळणार नाही, वेळ कुणाकडे आहे, कोण होता तो, समोर येऊदेत, सुक्क्या बांबुचे फटके देतो त्याला. हां आता आपली टीम इंग्लंड मध्ये जाऊन वन डे आणि टेस्ट दोन्ही हारुन आले तेव्हा थोडा वैताग आलाच होता पण नंतर झालेल्या काही सिरिज मुळे क्रिकेट मधला interst परत आला, त्यात झालेली ती ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेतील सिरीज तर एक नंबर होती.

सध्याच्या झालेल्या या काही सिरिज मुळे अनेक नविन गोष्टी समोर येता आहेत, पहिल्या टेस्ट नंतर सगळे म्हणाले की बॉस आता आश्विनच आपला मेन बॉलर आहे, हरभजन संपला, दुसर्‍या टेस्ट मध्ये आश्विनला ४ विकेट्सच मिळाल्या पण तिसर्‍या टेस्ट मध्ये तर त्याने कमालच केली आणि direct century च मारली, आणि मॅन ऑफ द सिरिजचा किताबसुद्धा पटकावला आता बोला . हरभजन तसा out of form आहे आणि unfit सुद्धा पण मला अस वाटत की तो येईलच परत. या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट सगळे सोईस्कररित्या विसरतात आहेत ती म्हणजे प्रग्यान ओझा, ज्याने सुद्धा २० विकेट्स घेतल्या होत्या, अर्थातच आश्विनचे पारडे त्यात जड आहे कारण तो बॅटिंगसुद्धा करतो, पण आता ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर कळेल आश्विन कस परफॉर्म करतो ते. 

पण आपला मेन प्रॉब्लेम अजुन तसाच आहे, सचिन, द्रविड, लक्ष्मण नंतर कोण? विराट कोहली तर यापैकी एकाला सहज रिप्लेस करेल पण बाकी दोन जागांचे काय? युवराज सिंगने वन डे सारखेच टेस्टमध्ये सुद्धा पुनरागमन करावे अस वाटते पण काय माहित त्याचा टेस्टमध्ये काही भरवसा वाटत नाही. रोहित, रैना आणि पुजारा काही करु शकले तर बघता येईल. आपला अजुन एक प्रॉब्लेम म्हणजे फास्ट बॉलिंग, झहिर फिट झाला तर ठिक आहे पण हे उमेश यादव आणि वरुण आरोनचा काही खर वाटत नाही, परवाच्या मॅचला तर त्या रवी रामपॉलने त्यांना बडवला. इशांत शर्मा सुद्धा काही फार फॉर्म मध्ये आहे अस वाटत नाही. हे मुनाफ पटेल, इरफान पठाण, आशिश नेहरा, आर पी सिंग हे कुठे गायब झाले काय माहित? असो सध्यातर मी २६ डिसेंबरपासुन सुरु होणार्‍या boxing day test match चीच वाट बघतोय.

बाकी गोष्टींचे सांगायचे तर खरी मजा तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेच्या सिरिजमुळे आली. आयला ऑस्ट्रेलिया 47 all out! असा सिन या आयुष्यात बघायला मिळेल अस वाटल नव्हते. फिलँडर आणि स्टेनने ऑस्ट्रेलियाच्या फुल स्ट्रेंग्थ टीमची लावलेली वाट बघुन मजा आली. कोण कुठला फिलॅंडर आणि तो येऊन ऑस्ट्रेलियाला एका मागुन एक धक्के देत होता त्याने २ मॅचच्या सिरिजमध्ये तब्बल १४ विकेट्स काढल्या. (च्या आयला भारतात असे बॉलर का येत नाहीत काय माहित) ऑस्ट्रेलिया पण काही कमी नव्हती, रायन हॅरिस आणि शेन वॉटसनने तर त्या आधी आफ्रिकेला ९६ मध्येच ऑल आऊट काढला होता. पण पहिली मॅच हारल्यावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला, फक्त १८ वर्षाच्या पॅट कमिन्सने येऊन ६ विकेट्स घेतल्या आणि दुसर्‍या इनिंगला आफ्रिकेच्या बॅटिंगचा बॅंड वाजवला. दुसरी टेस्ट मॅच मात्र अप्रतिम झाली ऑस्ट्रेलियाने ती कशी बशी २ विकेट्सने जिंकली खरी पण शेवट पर्यंत ती मॅच कोण जिंकेल हे सांगणे कठिण होते. Test cricket at its best.



आणि कोणी बघितली असेल तर श्रीलंका आणि पाकिस्तान मधली वन डे सिरिजसुद्धा मस्तच झाली, पाकिस्तानने ४-१ ने लंकेला हारवले आणि त्यात शाहिद आफ्रिदीने तर कमालच केली, तो जगातला एकमेव असा खेळाडु आहे, ज्याने एकाच मॅचमध्ये अर्धशतक काढले आणि ५ विकेट्स सुद्धा घेतल्या, वाचुन आश्चर्य वाटेल, पण आफ्रिदीच्या वनडे मध्ये तब्बल ३३३ विकेट्स आहेत, आपल्या हरभजनच्या काही २५० वगैरेच आहेत आणि कुंबळेच्या ३३७ आहेत, आफ्रिदीने एवढ्या विकेट्स कधी घेतल्या काय माहित. काहीसुद्धा म्हंटले तरी आफ्रिदीची बॉलिंग भन्नाट असते यात वाद नाही, मनात आणले तर तो मुनाफ पटेल पेक्षा सुद्धा जोरात बॉल टाकु शकेल अस मला तरी वाटते.

खर तर मला ही ऑस्ट्रेलिया टुर जरा जास्तच रानटी वाटते आहे, ऑस्ट्रेलिया आता पुर्वीसारखी राहिलेली नाही वगैरे अस समजुन जर आपण तिकडे गेलो तर आपला व्हाइट वॉश अटळ आहे, त्यांची फास्ट बॉलिंग यावेळेस मला जास्तच खतरनाक वाटते आहे, सिडल, हॅरिस, पॅट कमिन्स, जॉन्सन, वॉटसन आपली वाट लावायला तयारच आहेत आणि कालच संपलेल्या न्युझिलंड विरुद्धच्या मॅच मध्ये अजुन एका नवख्या बॉलरने पॅटिसनने त्याच्या पहिल्याच मॅच मध्ये ५ विकेट्स काढुन एकच हवा केली आहे. यार हे ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिकेला ताशी १५० किमी वेगाने बॉलिंग टाकणारे गोलंदाज कुठुन मिळतात काय माहित आपल्याकडे कोणी १४१ ने जरी बॉल टाकला तर तो हिरो बनुन जातो. हे जरी असले तरी यावेळेस ऑस्ट्रेलियाची बॅटिंग खुप भारी दिसत नाहीये पॉंटिगचा गांगुली करुन टाकला आहे, सगळे त्याच्या रिटायरमेंटची वाट बघताएत, ऑस्ट्रेलियाला हेडन आणि लॅंगर नंतर चांगले ओपनर सापडत नाहीयेत आणि नंबर ३ ला येणारा उस्मान ख्वाजा तसा नवखाच आहे, क्लार्क व्यवस्थित फॉर्मात आहे, पण बॅटिंग थोडी कमकुवतच दिसतेय. Anyways, जर धोनीच्या टीमने ऑस्ट्रेलियाला तिकडे जाऊन हारवले तर ते वर्ल्डकप जिंकण्याएवढेच मोठे यश असेल यात वाद नाही.

आणि शेवटी सांगायचे तर ही माझी १०१ नंबरची ब्लॉग पोस्ट आहे, माझ्या सारख्या आळशी माणुस २ वर्षात एवढया ब्लॉगपोस्ट लिहिल हे जर मला कोणी २ वर्षांपुर्वी सांगितले असते तर मी त्याला तु डोक्यावर पडला आहेस असच सांगितले असते, त्यामुळे सर्व वाचकांचे (मुद्दामुन येणारे आणि चुकुन येणारेसुद्धा) मन:पुर्वक आभार आणि मब्लॉवि चे शब्दात आभार मानणे शक्यच नाही तरी सुद्धा त्यांचे सुध्दा आभार.

5 comments:

mynac said...

गौरव, लेख छान झालाय आणि ह्या १०० व्या पोस्ट बद्दल अभिनंदन.
भज्जी आणि युवराज अजूनही संघात हवेत आणि इरफान,मुनाफ आणि मंडळी तुझ्या अजूनही लक्षात आहेत हे वाचून सद् गदित झालो.सद् गदित हा शब्द एवढ्या दिवसा नंतर एखाद्या पोस्ट मध्ये लिहायला मिळाला त्या मुळे पुन्हा एकदा सद् xxx ... नकोरे नको....राग नसावा पण 'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका...' नाविन्याची एक तुतारी फुंकायला मागताना " आमचा ह्या केशवसुतांनी लिहिलेल्या ओळींवर जास्त भरवसा आहे...त्या मुळे पंत गेले आहेत तर त्यांना जाऊन द्या आता रावांना चढू द्या...द्या जरा संधी द्या... ! :)

नागेश देशपांडे said...

मस्त रे...

छान झाली आहे पोस्ट, शतकासाठी अभिनंदन. :)

ऑस्ट्रेलिया दौरा...
खडतर आहे पण ओपनर आणि स्पिनर मुळे (तरी शेन वॉर्न भारतापुढे दिवे लावायचा हे माहित असून सुद्धा...) ऑसी कमकुवत आहेत.

Gaurav said...

@ Mynac - धन्यवाद,
'जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका’ याच्यावर विश्वास तर आहे, पण नविन लोक एवढे भारी दिसत नाही, म्हणुन जुन्यांची आठवण एवढेच.. असो आपल्याला काय तर ह्या सिरिजमध्ये जिंका एवढेच हवे, (जिंकले नाही तरी at least मानहानी तरी टाळा)

Gaurav said...

@Nagesh - धन्यवाद, ऑसी कमकुवत असले तरी त्यांना कमी लेखता येणार नाही.

Sagar Kokne said...

१०१! कधी लिहिल्यास..? माझ्या तर दोन वर्षात जेमतेम ३३ झाल्यात...:(
असो अभिनंदन...आणि क्रिकेट वर एवढा लिहितोस म्हणून १११ व्या पोस्टला उडी पण मारून घे !